कठोपनिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कठोपनिषद हे उपनिषद साहित्यातील एक महत्त्वाचे उपनिषद आहे. यामध्ये वाजश्रवा ऋषींचा पुत्र नचिकेत आणि यम यांच्यामध्ये घडलेला संवाद येतो. हे उपनिषद तत्त्वज्ञानप्रधान आहे.

आशय[संपादन]

या उपनिषदातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे देहरूपी रथाचे वर्णन,मृत्यू आणि स्वप्न यांचे खरे स्वरूप जाणून घेतले असता ब्रह्मज्ञान होते,तसेच आत्म्याचे अमरत्व,स्वर्ग इ.लोकांमध्ये येणारे अनुभव,ब्रह्मलोकातील आत्म्याचा अनुभव.ज्या मार्गाने कल्याण होऊ शकते तो मार्ग म्हणजे श्रेयस.आणि संसारातील भोग्य पदार्थांचा जो मार्ग तो प्रेयस होय.माणसानेच सारासार विचार करून दोन्हीपैकी मार्ग निवडायचा असतो.

आत्म्याची संकल्पना[संपादन]

हिंदू शास्त्रानूसार, सर्व वेद ज्या परम किंवा श्रेष्ठ पदाबद्दल बोलतात ते श्रेष्ठ पद म्हणजे ओंकार होय. ओम हेच परब्रह्म. आत्मा म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर ओंकाराची साधना केली पाहिजे. ज्ञानरूप असलेला आत्मा कुणापासून उत्पन्न होत नाही.आत्मा हाअजन्मा, नित्य, शाश्वत आहे. हा आत्मा कुणाला मारू शकत नाही किंवा तो मारलाही जात नाही. भगवद्गीता ग्रंथात हेच तत्त्वज्ञान प्रतिबिंबित झालेले दिसते.

वैशिष्ट्यपूर्ण विचार[संपादन]

  • ज्याची बुद्धी विवेकहीन असते तो माणूस उच्छृंखल वाटतो.अशुद्ध आचरण असलेला माणूस कधीच खरे ज्ञान जाणून घेऊ शकत नाही. जो माणूस मनावर संयम राखतो तो आत्मतत्त्व जाणून घेऊ शकतो.
  • शरीर हे रथासारखे आहे,बुद्धी ही रथाची सारथी ,मन हा लगाम आणि आत्मा शरीररूपी रथाचा स्वामी आहे.
  • अंगठ्याएवढ्या परिमाणाचा अंतरात्मा नेहमी माणसाच्या हृदयात समाविष्ट असतो.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ डॉ.पांडे सुरूचि,संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २), ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन