इंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंद्रदेव

इंद्रदेव

देवांचा राजा - इत्यादींची अधिपती देवता

मराठी इंद्र
संस्कृत इन्द्रः
कन्नड ಇಂದ್ರ
तमिळ இந்திரன்_(இந்து_சமயம்)
निवासस्थान इंद्र(स्वर्ग)लोकातील अमरावती
लोक स्वर्ग
वाहन ऐरावत नावाचा हत्ती, उच्चैःश्रवस्‌ नावाचा घोडा
शस्त्र वज्र, शंब, पवीर, भाला, धनुष्यबाण, अरप, निधा
वडील कश्यप
आई अदिति
पत्नी इंद्राणी/ शची
अपत्ये जयंत, जयंती
अन्य नावे/ नामांतरे सहस्राक्ष, वज्रपाणि, पुरंदर, मघवन्‌, हरिश्मश्रु, शक्र
नामोल्लेख ऋग्वेद, ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, पद्म पुराण, स्कंद पुराण, वायु पुराण,
इन्द्र - ऐरावतावर आरूढ असलेला

ऋग्वेदातील इन्द्र ही हिन्दुधर्मातली एक प्रमुख देवता आहे. ऋग्वेदातील एकूण सूक्तांच्या एक चतुर्थांश सूक्ते या देवतेला उद्देशून आहेत. हिन्दू विचारधारेनुसार हा स्वर्गाचा अधिपती आहे. ही पर्जन्यदेवता आहे. इन्द्राला सोमाबद्दल आसक्ती असल्याने त्याला सोमपा असे नाव आहे.[१]

इन्द्राणी ही इन्द्रपत्‍नी असून ती सूक्तद्रष्टी आहे. इन्द्राणीला अखण्ड सौभाग्यवतीपद पावलेले आहे. म्हणून लग्नात वाङ्‌निश्चयाच्यावेळी वधूकडून तिची पूजा करवितात. विदर्भात इन्द्राणीचे मन्दिर आहे.

इन्द्राचे देऊळ मात्र कोठेही नाही.इंद्रालाच देवेंद्र, सुरेंद्र, अमरेंद्र, वज्रपाणि, सहस्राक्ष, वसावा, पुरंदर, शक्र, सोमपा, मेषवृषण असे विविध नावने ओळखले जाते.इंद्र हा सुरांचा म्हणजेच देवांचा राजा म्हणून देवेंद्र किंवा सुरेंद्र म्हणतात. इंद्राच्या हाती वज्र हे दधिची ऋषींंच्या अस्थीपासून बनलेले शस्त्र असल्याकारणाने इंद्राला वज्रपाणि म्हणून ओळखले जाते, पाणि म्हणजे हात. तसेच इंद्राला सहस्र म्हणजे हजार अक्ष म्हणजे डोळे असल्यामुळे सहस्राक्ष सुद्धा म्हणतात.

इन्द्रपद[संपादन]

इन्द्रपद हे पराक्रमाने किंवा तपाने प्राप्त होणारे एक पद आहे. आत्तापर्यन्त या पदावर बसलेली माणसे (एकूण २१) : अद्भुत, ऊर्जस्विन, देवास्पती, पुरन्दर (महाबल), प्रल्हाद, बलि, भवानुभव (मनोजव, मन्त्रद्रुम), भूतधामन,(ऋतुधामन), यज्ञ, रजि (आयुपुत्र), रोचक, विपश्चित, विभू (विधु), विश, विश्वभुुज, शक्र, शिखि (त्रिशिख, शिबी), सत्यजित, सूची, सुशान्ती ऊर्फ सुकीर्ती, हिरण्यकशिपु आणि रावणपुत्र मेघनाद.


  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला