पुनर्जन्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुनर्जन्म (हिंदू धर्म) या पानावरून पुनर्निर्देशित)
पुनर्जन्माची एक संकल्पना

पुनर्जन्म (इंग्रजी reincarnation) ही तात्त्विक किंवा धार्मिक संकल्पना आहे की जीवाचा मृत्यू झाल्यावर सजीवांचा भौतिक नसलेला मूल भिन्न भौतिक स्वरूपात किंवा शरीरात नवीन जीवन सुरू करते. याला पुनर्जन्म किंवा परिवर्तन म्हणतात, आणि हा चक्रीय अस्तित्वाच्या संस्कार शिकवणुकीचा एक भाग आहे. जैन, बौद्ध, शीख आणि हिंदू धर्म या भारतीय धर्मांचे केंद्रीय तत्त्व आहे.[१]प्राण्याच्या आत्म्याला मृत्यूनंतर मुक्ती मिळाली नाही तर तो आत्मा, भूत झाला नाही तर, दुसरे शरीर धारण करतो, अशी समजूत काही काही धर्मांत आहे. या नंतरच्या मिळालेल्या जन्माला पुनर्जन्म म्हणतात. आत्मा अमर असतो या गृहीततत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे.

    पुनर्जन्म म्हणजे पुन्हा एकदा जन्माला येणे होय. अविद्या, वासना आणि अश्लीलता मुळे माणूस पुन्हा एकदा जन्माला येतो व दुःख भोगतो. जलचर, पक्षी, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, माणूस व निर्वाण असे सहा प्रकारचे जन्म आहेत. मागील जन्मातील कर्मानुसार ऊर्जा शरीर धारण करते व जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या संसार चक्रात अडकतो. विद्या, विनय व शील या गुणामुळे निर्वाण प्राप्ती होते. बौद्ध धम्माचा मुख्य उद्देश निर्वाण प्राप्त करणे आहे.

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "Reincarnation". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-01.