भरत दाशरथि
Appearance
हा लेख दशरथ आणि कैकेयी यांचा पुत्र व रामाचा भाऊ असलेला इक्ष्वाकुवंशीय राजपुत्र याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, भरत.
हिंदू महाकाव्य रामायणानुसार भरत (निस्संदिग्ध नाव: भरत दाशरथि; संस्कृत: भरत; भासा इंडोनेशिया: Barata; चिनी: पोलोतो; बर्मी: भाद्रा; भासा मलेशिया: Baradan, तमिळ: பரதன் ; थाई: พระพรต ;) हा दशरथ आणि कैकेयी यांचा पुत्र आणि रामाचा भाऊ होता. राम, सीता व लक्ष्मण यांच्या वनवासकाळात त्याने रामाच्या वतीने अयोध्येचे राज्य चालवले. नैतिक व धर्म्य आचारात रामायणातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये भरताचे व्यक्तिमत्त्व रामाशी तुलनीय गुणवत्तेचे असल्याचे मानले जाते. किंबहुना रामायणाचे काही भाष्यकार या पैलूंत भरताला रामाहून उजवा मानतात.