विहीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कीनिगस्टीन गढीतील विहीर जर्मनी
कास गावातील प्राचीन पायऱ्यांची विहीर. चित्रात एक दरवाजाची चौकट दिसत आहे. हवे तेंव्हा यातील पाणी घेणे बंद अथवा सुरू करता येऊ शकते अशी ही सोय आहे.
वरून दिसणारे दृश्य
पायऱ्या

जमीनीखालील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात. विहिरीतील पाणी विद्युत् उपकरण वा मनुष्यबळ लावून काढले जाते आणि घरगुती वापरासाठी तसेच सिंचनासाठी वापरले जाते.

कार्य[संपादन]

भुपृष्ठाखाली असलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत पोचून पाणी उपलब्ध करणे.

रचना[संपादन]

प्रथम योग्य जागा निवडून तिथे खड्डा करतात. तो भूगर्भातील पाण्याच्या पातळीपर्यंत खोल नेतात. नंतर खड्ड्याच्या भिंतींचे दगड/विटा/काँक्रीट ने बांधकाम करतात. पाणी बाहेर काढण्यासाठी खिराडी/मोट वा विजेवर चालणार्‍या पंपाची व्यवस्था करतात. पाणी किती साठवायचे त्यावर विहिरीची गोलाई (रुंदी) अवलंबून असते. विहिरीची रचना साधारणतः वर्तुळाकार असते.

प्रकार[संपादन]

 • आड (अरुंद, खोल आणि बहुधा चौकोनी विहीर)
 • कूप (अरुंद आणि खोल विहीर)
 • गोल विहीर
 • चौकोनी विहीर
 • दीर्घिका (लांबट विहीर)
 • नलिका कूप
 • पुष्करणी
 • बारव - मोठी विहीर
 • भुडकी - जिच्यात बहुधा पाणी टाकावे लागते, अशी नदीकाठी असलेली विहीर. अशी एक विहीर पुण्यातील वर्तक बागेत आहे.
 • मोटांची विहीर
 • वापी - पायर्‍या असलेली विहीर
 • वाव
 • हौदपहा : बारामोटेची विहीर

संस्कृती व साहित्यातील झलक[संपादन]

विहिरीवरील स्त्री, पॉल सिगनॅक याचे तैलचित्र १८९२