भुयार
Appearance
जमिनीखालून काढलेल्या मार्गाला भुयार किंवा बोगदा म्हणतात. भुयार बहुतेकवेळा संपूर्ण बंदिस्त असते व त्याच्या सुरुवातीस व शेवटास खुला मार्ग असतो. भुयाराचा वापर पादचारी, वाहन, कालव्याचे पाणी किंवा रेल्वे यांच्या येण्याजाण्यासाठी केला जातो. भुयार बहुतेक वेळा लांब व अरुंद असते.
सर्वात लांब भुयारे
[संपादन]- २०१७ साली वापरात आल्यानंतर स्वित्झर्लंडमधील ५७ किमी गॉटहार्ड बेस रेल्वे बोगदा हा जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा असेल.
- ५३.९ किमी लांबीचा जपानमधील सैकान बोगदा हा सध्या जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे.
- इंग्लिश खाडीच्या खालून जाणारा चॅनल टनेल हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब रेल्वे बोगदा आहे.
- ११.२१५ किमी लांबीचा पीर पंजाल रेल्वे बोगदा हा भारतामधील सर्वात लांब बोगदा असेल.