पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख पुणे शहराविषयी आहे. पुणे जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?पुणे
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
पुणे, भारत
गुणक: 18°32′N 73°51′E / 18.53, 73.85
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
७०० चौ. किमी (२७० चौ. मैल)
• ५६० m (१,८३७ ft)
जिल्हा पुणे
लोकसंख्या
घनता
५०,४९,९६८ (२००८)
• ७,२१४/km² (१८,६८४/sq mi)
महापौर [[]]
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४११
• +020
• MH 12 (पुणे ) MH 14 (पिंपरी चिंचवड ) [MH 53 (दक्षिण पुणे) MH 54 (उत्तर पुणे) लवकरच ]
संकेतस्थळ: पुणे महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 18°32′N 73°51′E / 18.53, 73.85

पुणे Pune.ogg उच्चार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळामुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५०वर्षे प्रचलित होते.

शिवाजीच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.[ संदर्भ हवा ].समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी'; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.

अनुक्रमणिका

नाव[संपादन]

पुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' , आणि बोलीभाषेत ’पुणं’ असे वापरले जात होते. ब्रिटिशांनी ’पुणं’चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला 'पूना' असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केल्यापासून हे शहर पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते.

इतिहास[संपादन]

शनिवारवाडा

आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.

१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्‍नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.

भूगोल[संपादन]

पुण्याचे भारतातील स्थान

जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९ पूर्व असे आहेत.

पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवनाइंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडी समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे. पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रिश्टर स्केल चा भूकंप झाला होता.

पुण्यातील देवळे[संपादन]

पुण्यात चित्रविचित्र नावाची अनेक देवळे आहेत. ती त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-

 • अकरा मारुती
 • अवचित मारुती
 • उंटाडे मारुती
 • उंबर्‍या गणपती
 • उपाशी विठोबा
 • कसबा गणपती
 • काळा दत्त
 • खुन्या मुरलीधर
 • गंज्या मारुती
 • गवत्या मारुती
 • गुंडाचा गणपती
 • गुपचूप गणपती
 • चिमण्या गणपती
 • जिलब्या मारुती
 • डुल्या मारुती
 • तळ्यातला गणपती
 • तांबडी जोगेश्वरी
 • त्रिशुंड गणपती मंदिर (सोमवार पेठ). हे पुण्यातले सर्वात देखणे देऊळ आहे.
 • दगडूशेठ हलवाई गणपती
 • दशभुज चिंतामणी
 • दशभुजा गणपती
 • दक्षिणमुखी मारुती
 • दाढीवाला दत्त
 • नर्मदेश्वर गणपती
 • नवा विष्णू
 • निवडुंग्या विठोबा
 • पंचमुखी मारुती
 • पत्र्या मारुती
 • पर्वती देवस्थान
 • पानमोड्या म्हसोबा
 • गणेशखिंडीतील पार्वतीनंदन गणपती
 • पावट्या मारुती
 • पालखी विठोबा
 • पावन मारुती
 • पासोड्या विठोबा
 • पिवळी जोगेश्वरी
 • पोटशुळ्या मारुती आणि शनी
 • प्रेमळ विठोबा
 • बटाट्या मारुती
 • बंदिवान मारुती
 • बायक्या विष्णू
 • भांग्या मारुती
 • भिकारदास मारुती
 • मद्राशी गणपती
 • माती गणपती
 • मोदी गणपती
 • वरद-गुपचूप गणपती
 • वीराचा मारुती
 • शकुनी मारुती
 • शेषशायी विष्णूचे मंदिर (कन्याशाळेजवळ)
 • सदरेतला गणपती
 • साखळीपीर मारुती
 • सारसगबागेतला सिद्धेश्वर
 • सोट्या म्हसोबा
 • सोन्या मारुती
 • हत्ती गणपती

पुण्यातील असलेले नसलेले हौद[संपादन]

एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते. या हौदांत एकत पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे. अजूनही काही हौद शिल्लक आहेत.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :

 • काळा हौद
 • खाजगीवाले बागेतील हौद
 • गणेशपेठ हौद
 • ढमढेरे बोळातील हौद
 • तांबट हौद
 • तुळशीबाग हौद
 • नाना हौद
 • पंचहौद
 • फडके हौद
 • फरासखाना हौद
 • बदामी हौद
 • बाहुलीचा हौद
 • बुधवार वाड्यातील हौद
 • बोहरी जमातखान्यातील हौद
 • भाऊ दातार हौद
 • भाऊ महाराज हौद
 • भुतकर हौद
 • रामेश्वराजवळचा हौद
 • लकडखान्यातील हौद
 • पुणे विद्यापीठातील पुष्करणी
 • शनिवारवाड्यातील दोन हौद (पुष्करणी आणि हजारी कारंजे)
 • सदाशिव पेठ हौद (हे दोन हौद होते)
 • साततोटी हौद

बगीचे आणि पोहण्याचे तलाव[संपादन]

पुणे शहरात ८९ बगीचे आणि जवळजवळ तितकेच पोहण्याचे तलाव आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.

पुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’[संपादन]

एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे. या गेटांच्या ठिकाणी आता पोलीस चौकी असेलच असे नाही.

 • कोंढवा गेट
 • क्वार्टर गेट
 • पूल गेट
 • पेरू गेट
 • फडगेट
 • मरीआई गेट
 • म्हसोबा गेट
 • रामोशी गेट
 • स्वारगेट

पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baugs)[संपादन]

 • ओशो झेन बाग
 • कबीर बाग
 • कौसरबाग (कोंढवा-पुणे)
 • चिमण बाग
 • ढमढेरे बाग
 • तुळशीबाग
 • नातूबाग
 • पटवर्धन बाग
 • पुरंदर बाग (आता अस्तित्वात नाही)
 • पेरूचा बाग
 • पेशवे बाग
 • बेलबाग
 • भिडेबाग
 • माणिकबाग
 • मोतीबाग
 • रमणबाग
 • रामबाग
 • वसंतबाग
 • सारसबाग
 • सिताफळबाग
 • सुपारीबाग
 • सोपानबाग
 • हिराबाग

डोंगर आणि टेकड्या -

पुणे शहरात आणि आजूबाजूला बर्‍याच टेकड्या आहेत.

 • कात्रजची टेकडी
 • गुलटेकडी
 • चतुःशृंगी
 • तळजाई
 • तुकाई
 • पर्वती
 • पाचगाव
 • पाषाण
 • फर्ग्युसन कॉलेजची टेकडी
 • बकरी हिल
 • बावधनची टेकडी
 • बोपदेव घाट-टेकडी
 • येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
 • राम टेकडी
 • रेंज हिल्स
 • वनदेवी टेकडी (कर्वे रोड)
 • वाघजई
 • विधि महाविद्यालयाची टेकडी (एस्‌एन्‌डीटीची टेकडी)
 • वेताळ टेकडी
 • सिंहगड
 • सूसची टेकडी
 • हनुमान टेकडी

खिंडी -

 • गणेश खिंड
 • डुक्कर खिंड

नद्या, तलाव, हौद आणि नाले -

 • आंबील ओढा
 • बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल व जलतरण तलाव, पद्मावती
 • ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड
 • इंद्रायणी
 • ए.बी.एस. फिटनेस अॅकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी
 • एलारस पूल्स, पूर्व चिंचवड
 • एस पी कॉलेजचा तरण तलाव
 • औंध तरण तलाव, औंध गांव
 • करपे तलाव(हा काँग्रेस हाउससमोर होता)
 • कात्रजचा तलाव
 • काळा हौद
 • कोंढव्याचे तळे
 • क्लब अॅक्वाया, कोरेगांव पार्क
 • न.वि. गाडगीळ जलतरण तलाव, (गाडगीळ प्रशाला)
 • गोपाळ हायस्कूलचा तरण तलाव
 • घोरपडी गाव तरण तलाव
 • चॉईस स्विमिंग पूल, कोथरूड
 • विष्णू अप्पा जगताप जल तरण तलाव, धनकवडी
 • जे.एस स्पोर्ट्‌स क्लबचा तरण तलाव, पिंपळे सौदागर
 • टिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला
 • डेक्कन जिमखाना या संस्थेचा तरण तलाव
 • केशवराव ढेरे तरण तलाव, येरवडा
 • तळजाई तलाव
 • देव नदी
 • धनकवडी तरण तलाव
 • नाग नदी
 • नागझरी
 • नांदे जलतरण तलाव, बालगंधर्व नाट्यगृह (जंगली महाराज रोड)
 • नाना हौद
 • नांदे तरणतलाव
 • निळू फुले तरणतलाव, स्वार गेटजवळ
 • न्यू जॉय्ज स्पोर्ट्‌स क्लब तरण तलाव, पाषाण
 • पंचहौद
 • पद्मावती तळे
 • नानासाहेब परुळेकर विद्यालयाच्या आवारातील जल तरण तलाव, विश्रांतवाडी
 • पवना नदी
 • पाषाण तलाव
 • पूना क्लबचा तरण तलाव
 • पूना स्पोर्ट्‌स अॅकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर
 • पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक
 • पेशवेकालीन कात्रजचा पाट
 • फडके हौद
 • भामा नदी
 • महाराष्ट्रीय मंडळाचा तरण तलाव
 • मानस सरोवर
 • मावळ सृष्टी रिझॉर्ट, लोणावळा
 • मुठा उजवा तीर कालवा
 • मुठा डावा तीर कालवा
 • मुठा नदी
 • मुळा नदी
 • वस्ताद बलभीम मोकाटे जल तरण तलाव, गुजरात कॉलनी (कोथरूड)
 • मोबियस फिटनेस सेंटर्चा तरण तलाव, बाणेर रोड
 • नथूजी दगडू भेगडे जलतरण तलाव, कर्वेनगर
 • भैरोबा नाला
 • राज एंटरप्रायझेसचा तरण तलाव, शिवणे (खडकवासला)
 • योगगुरू रामदेव महाराज क्रीडा संकुल व जलतरण तलाव, तळजाई टेकडी
 • लेखा फार्मचा तरण तलाव, देहू रोड
 • वंडर पूल्स, तळेगाव दाभाडे
 • शाहू कॉलेजचा तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ
 • शाहू तरणतलाव, सोमवार पेठ
 • शिवाजी तलाव(हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
 • श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव, आकुर्डी
 • शेप्स फिटनेस क्लबचा तरण तलाव, विश्रांतवाडी
 • श्री जिमचा तरण तलाव, विमाननगर
 • सदाशिव पेठ हौद
 • स.प. कॉलेजचा तरण तलाव, एस.पी. कॉलेजच्या मागे
 • साततोटी हौद
 • वीर सावरकर तरण तलाव, कोंढवा खुर्द
 • संजय हेल्थ क्लबचा तरण तलाव, पाषाण गाव
 • सारसबाग तळे
 • सिंफनी क्लबचा तरण तलाव, पाषाण
 • सिंबायोसिस कॉलेजचा तरण तलाव
 • सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड
 • सोलॅरिस तरण तलाव
 • हार्मनी अॅक्वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड

पुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले बनवले आहे. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत..उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरपुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्क जवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.

पूल[संपादन]

मुठा नदीवरील पूल-

 • एस.एम.जोशी पूल
 • ओंकारेश्वर पूल (नवीन नाव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल)
 • न.वि. गाडगीळ पूल
 • जयंतराव टिळक पूल
 • झेड पूल (Z-Bridge)
 • दगडीपूल (=डेंगळे पूल)
 • नवा पूल (=शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
 • भिडे पूल
 • म्हात्रे पूल
 • यशवंतराव चव्हाण पूल
 • राजाराम पूल
 • लकडीपूल (=संभाजी पूल)
 • वडगाव पूल
 • वारजे पूल (देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
 • संगम पूल (रेल्वेचा आणि वाहनांचा)
 • आणि शिवाय दोन दुचाकीसाठीचे पूल आणि काही कॉजवे.

मुळा नदीवरचे पूल -

 • औंधचा पूल (जुना)
 • औंधचा पूल (नवा- याचे नामकरण राजीव गांधी पूल असे केले आहे.)
 • दापोडीचा हॅरिस ब्रिज (रस्ता व रेल्वे)
 • दापोडी कॅन्टॉन्मेन्टमधील होळकर पूल
 • बोपोडीचा पूल
 • वाकड पूल

मुळा-मुठा नदीवरचे पूल -

 • बंड गार्डन पूल (=फिट्‌झजेराल्ड पूल)
 • बाबासाहेब आंबेडकर पूल
 • कल्याणी नगर पूल
 • मुंढवा पूल

ओढ्या-नाल्यांवरील पूल -

 • घसेटी पूल
 • (आंबील ओढ्यावरचा) दांडेकर पूल
 • उजव्या-डाव्या कालव्यांवरचे पूल
 • (नागझरी वरचा) दारुवाला पूल
 • भैरोबा नाला पूल

पुतळे[संपादन]

पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७१ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. २१ पूर्णाकृती व ५० अर्धाकृती पुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजीचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला दादोजी कोंडदेव।दादोजी कोंडदेवांचा पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही.

पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या सर्व प्रकारच्या पुतळ्यांची जंत्री :

स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी


अन्य ठिकाणचे पुतळे
 • कर्वे पुतळा, कोथरूड
 • पहिला बाजीराव पुतळा, शनिवारवाडा
 • झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, संभाजी उद्यान
 • प्रमोद महाले यांचा पुतळा, सुपर मार्केट चौक, पूर्वी दीप बंगला चौक (पुणे)
 • आचार्य अत्रे पुतळा, बालगंधर्व नाट्यगृहाजवळील सावरकर भवनपाशी
 • महात्मा फुले पुतळा, पुणे विद्यापीठ
 • छत्रपती शाहू महाराज पुतळा, एस्‌एस्‌पी‍ए्म्‌‍एस (पुणे)
 • सावरकर पुतळा, सारसबाग (पुणे),
 • संभाजीचा अर्ध पुतळा, गरवारे उड्डाण पूल,डेक्कन जिमखाना (पुणे), वगैरे.

पेठा[संपादन]

पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून-नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ- ठेवली गेली आहेत.१६२५ मध्ये शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:
कसबा पेठ, रविवार पेठ ऊर्फ मलकापूर पेठ, सोमवार पेठ (हिला शाहापूर पेठ म्हणत), मंगळवार पेठ (हिचे जुने नाव शास्तापुरा पेठ), बुधवार पेठ ऊर्फ मुहियाबाद पेठ, गुरुवार पेठ ऊर्फ वेताळ पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, गंज पेठ ऊर्फ मीठगंज (महात्मा फुले पेठ ?), सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, मलकापूर पेठ (म्हणजेच रविवार पेठ), मुहियाबाद पेठ (म्हणजेच बुधवार पेठ), नाना पेठ, रास्ता पेठ, गणेश पेठ, वेताळ पेठ (म्हणजेच गुरुवार पेठ), सेनादत्त पेठ, नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट), घोरपडे पेठ.

गल्ल्या, बोळ, आळ्या

जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत. त्यांतल्या काहींची नावे:

 • कापड‍आळी (कापडगंज)
 • कुंभारवाडा (जवळच कुंभारवेस, कागदीपुरा)
 • गाय आळी
 • गूळ आळी
 • गौरी आळी
 • चांभार आळी
 • चोळखण आळी
 • जुनी तपकीर गल्ली
 • जोगेश्वरीचा बोळ
 • तांबट आळी
 • तुळशीबागेचा बोळ
 • दाणे आळी
 • नेने घाट
 • पंतसचिवाची पिछाडी
 • फणी आळी
 • बुरूड आळी
 • बोहरी आळी
 • भट आळी
 • भाऊ महाराजांचा बोळ
 • मुंजाबाचा बोळ
 • मुजुमदारांचा बोळ
 • मेहुणपुरा
 • लोणार आळी
 • लोणीविके दामले आळी
 • शालूकर बोळ (=भाऊ रंगारी बोळ)
 • शिंदे आळी
 • शिंपी आळी

उपनगरे[संपादन]

पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
अप्पर इंदिरा नगर, अरण्येश्वर, आनंदनगर (सिंहगड रस्ता), आंबेगाव, एरंडवणे, औंध, कँप, कर्वेनगर, कल्याणीनगर, कात्रज, कोंढवा, कोथरूड, कोरेगाव पार्क, खडकी, खराडी, गुलटेकडी, गोखलेनगर, घोरपडी, डेक्कन जिमखाना, दत्तवाडी, [दापोडी]], धनकवडी, धायरी, [[[पद्मावती]], पर्वती, पाषाण, पिसोळी, बाणेर, बालाजी नगर (सातारा रस्ता), बावधन, बिबवेवाडी, बोपखेल, भुसारी कॉलनी, मुंढवा, येरवडा, लोहेगाव, वडगांव (बुद्रुक), वडगांव शेरी, वडारवाडी, वाकडेवाडी, वाघोली, वानवडी, वारजे माळवाडी, विठ्ठलवाडी, विमाननगर, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सॅलिसबरी पार्क, सांगवी, सुस, हडपसर

पिंपरी चिंचवड- आकुर्डी, चिंचवड, तुकारामनगर, थेरगाव, निगडी, नेहरूनगर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, भोसरी , संभाजीनगर, सांगवी (जुनी आणि नवी), यमुनानगर, रहाटणी, रावेत, रूपीनगर , वाकड, हिंजवडी

हवामान[संपादन]

सिंहगडचा पुणे दरवाजा

पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात.

जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणार्‍या मॉन्सून वार्‍यांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरी पुणे शहरातील जीवनक्रम थांबवतात. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.

मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°से च्या खाली असते. डिसेंबरजानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१(?)मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले.

पुण्याच्या किमान तापमानाच्या काही नोंदी
 • २.८°से (२-१-१९९१)
 • ४.०°से (३-१-१९९१)
 • ४.४°से (१६-१-१९९४)
 • ४.५°से (२१-२-१९९३)
 • ४.७°से (२७-१-२००६)
 • ४.८°से (२१-१-१९९७)
इसवी सन २००३ सालापासूनचे पुण्याच्या तापमानाचे नीचांक
 • २००३ : ६.९°से
 • २००४ : ८.२°से
 • २००५ : ५.९°से
 • २००६ : ४.७°से
 • २००७ : ८.३°से
 • २००८ : ५.८°से
 • २००९ : ८.५°से
 • २०१० : ६.५°से
 • २०११ : ५.३°से
 • २०१२ : ६.६°से
 • २०१३ (१४डिसेंबरपर्यंत) : ६.८°सेजैवविविधता[संपादन]

इथे पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.

===वृक्षसंपदा===

दिल्ली हे भारतातील सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारतातील सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्ष‍अभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.

पुणे महानगरात १९९८साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची जातिनिहाय नावे अशी :-

देशी वृक्ष

अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, कदंब, कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम, काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, काजरा, काटेसावर, किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चारोळी, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नागचाफा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज (सावरकर स्मारकाजवळ असलेले हे झाड एकमेव आहे), शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सालई, सुकाणू, सुपारी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिरडा, हिवर, वगैरे.

परदेशी वृक्ष

अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री अँटिगोनान, रोज अॅपल (जाम), स्टार अॅपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आँकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हाँगकाँग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (अॅमहर्स्टिया नोबिलिस), कँडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कँपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, तांबडा चाफा (रेड फ्लँगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया अॅव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डाँबेया (वेडिंग प्लँट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लँबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (अॅव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), राय‍आवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सँडबॉक्स ट्री), स्पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे.

अर्थकारण[संपादन]

इन्फोसिस, हिंजवडी, पुणे

पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारतातील बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारतातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.

पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्‌ज् इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी.

विद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.

पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.

महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस., टेक महिंद्रा, विप्रो, पटनी, सत्यम, कॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जियोमेट्रिक सॉफ्टवेर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.

महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेर, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजिस, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., युजीएस, कॉग्निझंट, सिमँटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.

पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या महत्त्वाच्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.

पुण्यातील महत्त्वाच्या कंपन्यांची मुख्यालये -

कमिन्स इंडिया लिमिटेड, टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात केपीआयटी कमिन्स, इन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमँटेक,आय.बी.एम.,कॉग्निझंट सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.

बाजारपेठ[संपादन]

पुण्यातील पारंपरिक बाजारपेठ: लक्ष्मी रस्ता

मार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई ही ठिकाणे कृषी उत्पादनांच्या तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापाराकरिता प्रसिद्ध आहे. बुधवार पेठ विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हाँगकाँग-लेन महिलांवर्गात लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी लोकप्रिय आहे. अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता हा कपडा, तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कँप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट हे पाश्चात्य शैलीच्या उत्पादनांसाठी माहीत आहेत. त्या प्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता या भागातसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.

खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले[संपादन]

पुण्यामध्ये असंख्य चहाच्या टपऱ्या आहेत. मनपसंत चवीचा चहा ह्या टपर्‍यांवर स्वस्त दरात मिळत असल्याने या टपर्‍यांचा धंदा जोरात चालतो. अन्य खाद्यपदार्थ विकणारे गाडीवालेही आहेत.

२०१३ सालच्या डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे पुणे शहरात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणार्‍या व्यावसायिकांची आकडेवारी
व्यवसायाचा प्रकार नोंदणीधारक परवानाधारक
चहा, कॉफी, वडापाव, ऑम्लेट, स्नॅक्स ३६२८ ३४५
भेळ, पाणीपुरी, चॅट ७६९ २०
चिनी खाद्यपदार्थ ३१२ १३
उसाची गुर्‍हाळे १९७

प्रशासन[संपादन]

नागरी प्रशासन[संपादन]

महानगरपालिका इमारत

पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्‌. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.

जिल्हा प्रशासन[संपादन]

अधिक माहितीसाठी पहा पुणे जिल्हा

पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.

महानगर पोलीस यंत्रणा[संपादन]

पोलीस आयुक्त हा पुणे पोलिसांचा प्रमुख असतो. यो राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

पुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य
पुणे शहराबाहेरून जाणार्‍या मुंबई-बंगलोर महामार्गाचे चित्र

पुणे शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरुन पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता सिंगापूरदुबईला जाणार्‍या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे.

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक
रात्री दिसणारा सिंहगड रस्ता

नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्र सरकार सुरू करणार असून तो चाकणराजगुरुनगर या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवली गेली आहे.

शहरात पुणे व शिवाजीनगर ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळादरम्यान उपनगरी रेल्वे वाहतूक चालते. त्यामुळे पिंपरी, खडकीचिंचवड ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या लोणावळ्यापर्यंत जातात तर मुंबईच्या कर्जत पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्ग आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसर्‍या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-पनवेल लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.

पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे वेगवान झाली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला मुंबई, हैदराबादबंगळूर या शहरांशी जोडतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.

पुणे शहर हे महत्त्वाचे आय.टी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) केंद्र आहे. पुण्यात चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे.

तीन माणसे बसू शकतील अशा रिक्षा हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पुण्यात सुमारे ५० हजार ऑटोरिक्षा होत्या. त्यांपैकी पेट्रोलवर चालणार्‍या ११,३१२, डिझेलवरच्या १,९८४, सीएनजी (काँप्रेस्ड नॅचरल गॅस)वरच्या २७,०९४ तर एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस)वर चालणार्‍या ३,९५१ रिक्षा होत्या. हे आकडे पिंपरी-चिंचवडसाठी अनुक्रमे, १,५६८, ८०६, २,८२१ आणि ३६ होते.

पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वगैरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. पी.एम.टी. (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) व पी.सी.एम.टी. (पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट) या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण होऊन आता पी.एम.पी.एल. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.

लोकजीवन[संपादन]

पुणे शहराच्या लोकसंख्येत गेल्या २० वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारतातील सातवे सर्वांत मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो.

पुण्यात राहणार्‍यांना पुणेकर असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा मराठी असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेअर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले.

पुण्याची भगिनी शहरे[संपादन]

ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -

संस्कृती[संपादन]

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते. पुण्यात बोलली जाणारी भाषा ही मराठी भाषेची प्रमाणबोली (standard) मानली जाते. पुण्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुणेकरांना संगीत, कला, साहित्याची जबरदस्त आवड आणि जाण आहे.

गणेशोत्सव[संपादन]

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती

इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशपरदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिव्हल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.

कसबा गणपती-पुण्याचे ग्रामदैवत
 1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
 2. तांबडी जोगेश्वरी गणपती
 3. गुरुजी तालीम गणपती
 4. तुळशीबाग गणपती
 5. केसरीवाडा गणपती (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)

पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.

नवरात्र[संपादन]

फार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतु:शृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत चतुःशृंगीची यात्राही असते. दसर्‍याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते.

पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :-
सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे.

या दिवसात मुलींचे भोंडले होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची जागा आता गरब्याने घेतली आहे.

एके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसर्‍याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात.

पुणे शहरात २०१३सालच्या विजयादशमीला २९ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम ठेवला होता.

सवाई गंधर्व संगीत महोत्सव[संपादन]

पंडित भीमसेन जोशी ह्यांनी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. दरवर्षी हिवाळ्यामध्ये हा अभिजात संगीताचा सोहळा पुण्यात होतो. चार दिवस चालणार्‍या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत हिंदुस्तानीकर्नाटकी गायन, वादन व नृत्याचे संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते.

वसंतोत्सव[संपादन]

दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतोत्सव" हा संगीत महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणार्‍या या उत्सवात अनेक कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सादर केले जाते.

रंगभूमी[संपादन]

पुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. टिळक स्मारक मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सुदर्शन रंगमंच, गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, आंबेडकर सांस्कृतिक भवन व पिंपरी चिंचवड नाट्यगृह ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते. या यतिरिक्त बर्‍याच महाविद्यालयांची वर्तुळाकार प्रेक्षागृहे (amphitheatres) आहेत.

चित्रपट[संपादन]

पुण्यात अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत मराठी, हिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. पुणे स्थानकाजवळील आयनॉक्स, नगर रस्त्यावरील पी.व्ही.आरसिनेमॅक्स ,विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर, सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील सिटीप्राइड, कल्याणीनगर येथील गोल्ड पोलीस आयुक्तडलॅब्स आणि आकुर्डी येथील फेम गणेश व्हिजन ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद झाले).

पुणे शहरातली सभागृहे[संपादन]

 • अण्णा भाऊ साठे सभागृह
 • अत्रे सभागृह
 • डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन
 • सिंबॉयोसिस संस्थेचे आंबेडकर स्मारक खुले सभागृह
 • एस.एन.डी.टी. कॉलेजचे सभागृह
 • आबासाहेब गरवारे कॉलेज सभागृह
 • ग.ल. आपटे सभागृह
 • एस.एम. जोशी सभागृह
 • गणेश कला क्रीडा मंच
 • गणेश सभागृह
 • मधुसंचय गणेश मंदिर सभागृह
 • गोखले सभागृह
 • चव्हाण केंद्रातील मुख्य सभागृह, रंगस्वर सभागृह व सांस्कृतिक सभागृह
 • ज्योत्त्स्ना भोळे सभागृह (टिळक रोड)
 • टिळक स्मारक मंदिर सभागृह
 • तारापोर सभागृह
 • दरोडे सभागृह
 • नामदेव सभागृह
 • नीतू मांडके आयएमए सभागृह
 • नेहरू मेमोरियल हॉल
 • जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रोड)
 • पत्रकार भवन सभागृह
 • फादर बार्को सभागृह
 • बालगंधर्व सभागृह
 • बालशिक्षण मंदिर सभागृह (कोथरूड)
 • ॐकार बेडेकर गणपती सभागृह
 • मधुसंचय गणेश मंदिर सभागृह
 • महात्मा फुले सभागृह
 • महापालिका सभागृह
 • माधवराव पटवर्धन सभागृह (मराठी साहित्य परिषद)
 • मुनोत सभागृह
 • लोकमान्य सभागृह
 • वराहमिहीर सभागृह
 • विष्णुप्रसाद सभागृह
 • शकुंतला शेट्टी सभागृह, (कर्नाटक हायस्कूल)
 • सह्याद्री सदन सभागृह
 • सिद्धार्थ हॉल
 • सोनल हॉल
 • स्नेहसदन सभागृह
 • स्वप्नपूर्ती सभागृह
 • क्षिप्रा सभागृह
 • ज्ञानेश्वर नरहरे सभागृह

धर्म- अध्यात्म[संपादन]

चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतु:शृंगी देवस्थान पाहते. दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते. शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.

पुण्याजवळील आळंदीदेहू येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी तर देहू येथे संत तुकारामांचे वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात वारी पोहोचते.

पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. प्ण्यात ओहेल डेविड हे इस्रायल देशाबाहेरचे आशियातील सर्वांत मोठे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे. पुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन बागा व मोठे ध्यानगृह आहे.

कबरी, मशिदी, दर्गे

 • धाकटा शेखसल्ला(हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन चिश्ती) दर्गा
 • मोठा शेखसल्ला दर्गा
 • गारपीर (शमशाद हुसेन खान)
 • साचापीर (अब्दुल रझाक)
 • सुभानशा दर्गा, बोहरी आळी
 • अल्लाउद्दीनसाहेब पीर (सर्किट हाउसच्या समोर)
 • कुतुबुद्दीन पीर (दारूवाला पुलाजवळ)
 • मस्तानीची कबर (शनिवारवाड्याशेजारी)


खवय्येगिरी[संपादन]

सुजाता मस्तानी

काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची बाकरवडी, सुजाता व कावरे कोल्ड्रिंक्स यांची मस्तानी, बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. जंगली महाराज रस्ता, कँप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्गसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली खूप प्रसिद्ध आहे. अमृततुल्य ही चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे मिसळ, वडा-पाव हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.

पुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, भेळ, पाणीपुरी इत्यादी हे इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहे. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते.

पुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज ह्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत.

मद्यप्रेम[संपादन]

३१ मार्च २०१२ अखेरच्या वर्षभरात ५१२ कोटी रूपयांची दारू पुण्यात रिचविली गेली.[१]

प्रसारमाध्यमे[संपादन]

सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी ,महाराष्ट्र टाइम्स, व केसरी ही मराठी वृत्तपत्रे तर इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, सकाळ टाइम्स, व महाराष्ट्र हेराल्ड ही इंग्लिश वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. आकाशवाणी, रेडियो मिर्ची, रेडियो सिटी, विविध भारती, रेडियो वन व पुणे विद्यापीठाची विद्यावाणी ही रेडियोकेंद्रे पुण्यात ऐकता येतात. झी मराठी, ई टीव्ही मराठी, सह्याद्री दूरदर्शन या मराठी दूरचित्रवाहिन्या विशेष लोकप्रिय आहेत. अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील उपलब्ध आहेत. बीएसएनएल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आंतरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात.

शिक्षण[संपादन]

पुणे विद्यापीठ

भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्गसन महाविद्यालय, स.प.महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.

पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकीत शिक्षण संस्था आहेत. पुण्यात शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकर देखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.

शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयुका (IIUCA), आघारकर संशोधन संस्था (ARI), सी-डॅक (C-DAC), राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV), राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था (NCCS), यशदा, भांडारकर संशोधन संस्था, द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC-Grapes), कांदा आणि लसुण- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC- Onion and Garlic), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्था (IISER), ईर्षा (IRSHA), वणस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज (AFMC), भलीमोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण (GMRT) सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.

प्राथमिक व विशेष शिक्षण[संपादन]

पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्यात असतो. पुण्यातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (आयसीएसई/सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. पुणे हे जपानी भाषेच्या शिक्षणाचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापिठाबरोबर अनेक संस्था जपानी भाषेत शिक्षण देतात. जर्मन (मॅक्स म्युलर भवन), फ्रेंच (आलियाँस फ्राँसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून रशियन, जर्मनफ्रेंच या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात.

उच्च शिक्षण[संपादन]

पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न असतात. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत. पुणे ही विद्यार्थी संख्येनुसार जगातील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे.

पुण्यातील महत्त्वाची महाविद्यालये[संपादन]

महाविद्यालये अभियांत्रिकी महाविद्यालये वैद्यकीय महाविद्यालये व्यवस्थापन महाविद्यालये इतर शाळा
नेस वाडिया महाविद्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय बी.जे. मेडिकल कॉलेज सिंबायोसिस राष्ट्रीय विमा अकादमी (नॅशनल इन्शुअरन्स अकॅडमी) नू.म.वि.
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी लष्कराचे ए.एफ.एम.सी.(आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) इंदिरा इन्स्टिट्यूट वाकड आय.एल.एस. विधि महाविद्यालय साधना विद्यालय हडपसर
आबासाहेब गरवारे महाविद्यालय भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय पुणे विद्यापीठाचे पुम्बा डेक्कन कॉलेज (पुरातत्त्व व भाषाशास्त्र) न्यू इंग्लिश स्कूल
नौरोसजी वाडिया महाविद्यालय एम.आय.टी. आय.एम.डी.आर. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (संस्कृत)
स.प. महाविद्यालय व्ही.आय.टी. भारतीय विद्याभ्यास (आयुर्वेद व सामाजिक शास्त्रे)
फर्ग्युसन महाविद्यालय गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅन्ड सोशल सायन्सेस
मॉडर्न महाविद्यालय, पुणे [[]]

पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.

संशोधन संस्था[संपादन]

पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तर विद्यापीठाच्या आवारात आयुका, नॅशनल सेंटर फॉर रेडियो पोलीस अॅस्ट्रोफिजिक्सनॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था (Central Water and Power Research Station), उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, आघारकर संशोधन संस्था, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाराष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्थाही पुण्यात आहेत.

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था[संपादन]

लष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल(एस्‌‍एस्‌पीएम्‌‍एस), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग वगैरे. तसेच लष्कराचे ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. त्याचबरोबर आर्मामेंट रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव - डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलोजी), एक्स्प्लोझिव्ह रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनआर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.

खेळ[संपादन]

क्रिकेट हा पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हॉकी, फुटबॉल, टेनिस, कबड्डीखोखो हे खेळ देखील खेळले जातात. पुण्यात दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली जाते. पुण्यातील नेहरू स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. डेक्कन जिमखान्यात अनेक खेळ खेळण्याची सुविधा आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४चे राष्ट्रीय खेळ व इ.स. २००८ मध्ये दुसरे यूथ कॉमनवेल्थ खेळ भरले होते.

मूळ पुण्यातील असलेले प्रसिद्ध खेळाडू- हेमंतहृषीकेश कानेटकर, राधिका तुळपुळेनितीन कीर्तने (टेनिस) हे आहेत. ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल शिरोळे हे पुण्याचे खासदार आहेत.

पुण्याजवळील गहुंजे येथे क्रिकेटचे एक अप्रतिम स्टेडियम आहे. त्याचे नाव सुब्रतो रॉय स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.

पर्यटन स्थळे[संपादन]

पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण, राजा दिनकर केळकर संग्रहालय, पानशेत धरण, बालगंधर्व रंगमंदिर, लाल महाल, आगाखान पॅलेस, सारसबाग, विश्रामबाग वाडा, कात्रज सर्प उद्यान, महात्मा फुले वाडा, फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पाताळेश्वर मंदिर, बंड गार्डन, शिंद्यांची छत्री

पुणे शहराच्या आसपास व पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकरिता पहा- पुणे जिल्हा

पुणे शहरासंबंधी पुस्तके[संपादन]

 • नामवंत पुणेकर, संस्था - वास्तू (लेखक: शां.ग. महाजन)
 • पुणे शहराचा ज्ञानकोश - खंड १ (लेखक : शां.ग. महाजन)
 • मुठेकाठचे पुणे (लेखक :प्रा. प्र.के. घाणेकर). पुस्तक प्रकाशन तारीख २८-३-२०१५.
 • संध्याकाळचे पुणे (लेखक दि.बा. मोकाशी)

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]


Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.