जालना जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जालना जिल्हा
जालना जिल्हा
MaharashtraJalna.png

महाराष्ट्र राज्याच्या जालना जिल्हाचे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय जालना
तालुके जालनाअंबडभोकरदनबदनापूरघणसवंगीपरतूरमंठाजाफराबाद

क्षेत्रफळ ७६१२ कि.मी.²
लोकसंख्या १९,५८,४६३ (२०११)
लोकसंख्या घनता २५७/किमी²
साक्षरता दर ७३.६१
लिंग गुणोत्तर १.०७ /

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे
लोकसभा मतदारसंघ जालना (लोकसभा मतदारसंघ)
खासदार रावसाहेब दानवे पाटील
पर्जन्यमान ७६३ मिमी

संकेतस्थळ


हा लेख जालना जिल्ह्याविषयी आहे. जालना शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.

जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्त्वाच्या संकरीत बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी, परतूर, मंठाजाफराबाद. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मी.मी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खो-यात येतो. जिल्ह्याचा ७५% भाग खरिफ पीकांसाठी वापरला जातो ज्यातील ४०% रब्बी पीकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पीके आहेत. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्त्वाचे हातमागयंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे.

जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ति- समर्थ रामदास स्वामी, जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवाले, दासू वैद्य इत्यादी.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- राजूर येथील श्री गणेश मंदीर, अंबड येथील मत्स्योदारी देवी, जळीचा देव (जयदेववाडी).

[संपादन] संदर्भ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये