भंडारा जिल्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भंडारा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधीत तांदूळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृध्द आहे. भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पुर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर हा जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा डोंगराळ भाग आहे. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ कि.मी² असून एकूण लोकसंख्या ११,३५,८३५ इतकी आहे. [१] वैनगंगा ही जिल्ह्याची प्रमुख नदी आहे तर ३,६४८ लहान तळे भंडा-यात आहेत. भंडारात लोहखनिज विपुल प्रमाणात असून प्रमुख पीके पुढीलप्रमाणे- तांदूळ, गहू, मिलेट (तृणधान्ये). भंडारा जिल्हा महाराष्ट्राचे तांदूळ आगार म्हणून प्रसिद्ध आहे. तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, कालिकाम्मोड या सुवासित जाती प्रसिद्ध आहेत.
जिल्ह्याची प्रेक्षणीय स्थळे - अंबागड किल्ला, कोरांबीचे देवी मंदीर
[संपादन] जिल्ह्यातील तालुके
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाहेरील दुवे
महाराष्ट्र राज्य
|
|||||||||||||||||||||||||