बुलढाणा जिल्हा
| बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा |
|
|---|---|
|
महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्हाचे स्थान |
|
|
|
|
| राज्य | महाराष्ट्र, |
| विभागाचे नाव | अमरावती विभाग |
| मुख्यालय | बुलढाणा |
| तालुके | खामगांव • चिखली • संग्रामपूर • सिंदखेडराजा • देउळगांव राजा • नांदुरा • बुलढाणा तालुका • मेहकर • मोताळा • मलकापूर • लोणार • जळगाव जामोद • शेगांव |
|
|
|
| क्षेत्रफळ | ९६४० कि.मी.² |
| लोकसंख्या | २५,८८,०३९ (२०११) |
| लोकसंख्या घनता | २६८/किमी² |
| साक्षरता दर | ८५% |
| लिंग गुणोत्तर | १.०१ ♂/♀ |
|
|
|
| जिल्हाधिकारी | श्री. बी जी वाघ |
| लोकसभा मतदारसंघ | बुलढाणा (लोकसभा मतदारसंघ) |
| खासदार | प्रतापराव जाधव |
| पर्जन्यमान | ९४६ मिमी |
|
|
|
| संकेतस्थळ | |
बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात स्थित आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० कि.मी² इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला जळगाव जालना परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा,(मध्य प्रदेश) आहे. [१]
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून १३ तालुक्यांशी राज्य महामार्गाशी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत.
जिल्ह्यात समविष्ट तालुके पुढील प्रमाणे- संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जमोड, खामगाव, मोताळा, नांदुरा, चिखली, बुलढाणा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व लोणार.
जिल्हा शेगाव येथील संत गजानन महाराज मंदीर व लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर या ठिकांणासाठी प्रसिद्ध आहे. जिजाबाई यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथे आहे. तर नांदुरा मध्ये जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
[संपादन] जिल्ह्यातील तालुके
- खामगांव
- चिखली
- संग्रामपूर
- सिंदखेडराजा
- देउळगांव राजा
- नांदुरा
- बुलढाणा तालुका
- मेहकर
- मोताळा
- मलकापूर
- लोणार
- जळगाव जामोद
- शेगांव
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाहेरील दुवे
महाराष्ट्र राज्य
|
|||||||||||||||||||||||||
'ठळक मजकूर'