सातारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख सातारा शहराविषयी आहे. सातारा जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


सातारा
जिल्हा सातारा जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या (शहर) १,०८,०४८
(२००१)
क्षेत्रफळ (जिल्हा)१०,४८४ कि.मी²
दूरध्वनी संकेतांक ०२१६२
टपाल संकेतांक ४१५-xxx
वाहन संकेतांक MH-११
संकेतस्थळ http://www.satara.nic.in

सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे.हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मी. [ संदर्भ हवा ] उंचीवर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगळुर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे.

इतिहास[संपादन]

सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. त्यामुळे सातारा शहराला शाहूनगरी म्हणूनही ओळखले जाते.

भौगोलिक[संपादन]

सातारा शहराचे सूर्यास्ताच्या वेळेस चारभिंतीवरून घेतलेले हे छायाचित्र. (दि. ११ डिसेंबर, २०१०; सायं. ०६.१५ वा.)
साताऱ्याचे भारतातील स्थान

सातारा शहरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे.
सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णावेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे साताऱ्यात पावसाचे प्रमाण खूप आहे. साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलीमीटर एवढा पाऊस पडतो.

पेठा[संपादन]

सातारा शहराची मुख्य वस्ती विविध पेठांमध्ये आहे. सातारा शहरातील पेठांची नावे अशी आहेत

 • गडकर आळी - साताऱ्यातील सर्वात जुन्या ठिकाणांचा उल्लेख करताना गडकर आळी हे नाव प्रथम घेतले जाते. सातारचा किल्ला (अजिंक्‍यतारा) ही मराठ्यांची चौथी राजधानी समजली जाई. येथे इसवी सन १७५० ते १८००च्या कालखंडात गडावर देखरेख करणारे गडकरी ज्या ठिकाणी राहत, त्या वस्तीस गडकर आळी या नावाने ओळखले जाते. येथे लोकांच्या दहा ते वीस घरांची जुनी वस्ती आहे. सध्या ह्या वस्तीचा समावेश शाहूपुरी ग्रामपंचायतीत केला जातो
 • रविवार पेठ
 • सोमवार पेठ
 • मंगळवार पेठ
 • बुधवार पेठ
 • गुरुवार पेठ
 • शुक्रवार पेठ
 • शनिवार पेठ
 • माची पेठ
 • सदाशिव पेठ
 • भवानी पेठ
 • मल्हार पेठ
 • यादोगोपाळ पेठ
 • प्रतापगज पेठ

उपनगरे[संपादन]

सातारा शहराची लोकवस्ती वाढत जाऊन शहराच्या सभोवती अनेक उपनगरे उभी राहिली आहेत.त्यांची नावे अशी आहेत

 • शाहुनगर
 • संगमनगर
 • कृष्णानगर
 • वेण्णानगर
 • कोयनानगर - कोयना जलविद्युत वीजनिर्मिती प्रकल्पाच्या निमित्ताने ते वसवले गेले.
 • शाहूपुरी -सध्या ह्या उपनगरास ग्रामपंचायतीचा दर्जा असुन, हे सर्वात मोठे उपनगर समजले जाते
 • सदरबझार - साताऱ्यातील काही महत्त्वाची ठिकाणे उदा. सैनिक स्कूल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, इ. सदरबझारमध्ये आहेत.
 • करंजे
 • कर्मवीरनगर
 • कोडोली- कोडोली गावामध्‍ये सातारा शहरातील औद्योगिक वसाहत आहे. तसेच कोडोली ग्रामपंचायत ही सर्वात मोठे उपनगर समजले जाते.
 • तामजाईनगर

शैक्षणिक[संपादन]

सातारा शहर म्हणल्यास लगेच आठवतात कर्मवीर भाऊराव पाटील! कर्मवीरांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय साताऱ्यात आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माइल मुल्ला विधि- महाविद्यालय, य़शवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यातील काही उल्येखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र साताऱ्यातच शिकवला.
सातारा शहर देशात येथील सैनिक स्कूलमुळे ओळखले जाते.. २३ जून १९६१ मध्ये साताऱ्यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.
आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात.

बाह्यदुवे[संपादन]