गडचिरोली जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख गडचिरोली जिल्ह्याविषयी आहे. गडचिरोली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
गडचिरोली जिल्ह्याचे स्थान

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्वेस असून आंध्र प्रदेशछत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४४१४ चौ.कि.मी आहे.

विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

जिल्ह्याची लोकसंख्या ९,७०,२९४ आहे. साक्षरता ६०.१% तर आदीवासी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ३८.३% आहे. गडचिरोली जिल्हा तुलनेने मागास आहे व आदीवासी भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात गोंड, माडिया, कोलम व परधान या आदीवासी जमाती वास्तव्यास आहेत. आदीवासी वनांच्या आतल्य भागात राहतात. त्यांच्या देवाचे नाव 'पेरसा पेण' आहे. रेळा व ढोल नाच, दिवाळी व होळी हे त्यांचे मुख्य उत्सव आहेत.

जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७९.३६% भाग वनांनी व्यापला आहे. जिल्हा बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. तांदूळ हे प्रमुख शेती-उत्पन्न आहे तर ज्वारी, तेलबिया, तुर , गहू ही पीके देखील घेतली जातात. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कडक उन्हाळे व हिवाळे असतात.

भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहे पण मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात मराठी व्यतिरीक्त गोंडी, माडिया, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगडी या भाषादेखील बोलल्या जातात. जिल्ह्यातील प्रमुख नदी ही गोदावरी आहे.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासीक शिव मंदीर व चप्राळा येथील हनुमान मंदीर प्रसिद्ध आहे.

डॉ.अभय व राणी बंग यांची सर्च (शोधग्राम, गडचिरोली) ही संस्था आदीवासींना आरोग्यसेवा पुरवतात. डॉ.प्रकाश आमटे यांची लोक-बिरादरी (हेमलकसा,भामरागड) संस्था देखील आदीवासींना आरोग्य व सामाजिक सेवा पुरवते.

जिल्ह्या्तील तालुके [संपादन]

संदर्भ [संपादन]

गडचिरोली एन.आय.सी