अमेरिकेची संयुक्त संस्थाने
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अमेरिका
United States of America
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
|||||
|
|||||
| ब्रीदवाक्य | E Pluribus Unum (पारंपरिक; अर्थ: विविधतेत एकता) In God We Trust (अधिकृत, १९५६ पासून) |
||||
| राजधानी | वॉशिंग्टन डी.सी. | ||||
| सर्वात मोठे शहर | न्यूयॉर्क | ||||
| राष्ट्रप्रमुख | बराक ओबामा(राष्ट्राध्यक्ष) (उपाध्यक्ष) | ||||
| पंतप्रधान | - | ||||
| सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश | - | ||||
| राष्ट्रगीत | स्टार स्पँगल्ड बॅनर | ||||
| राष्ट्रगान | - | ||||
| स्वातंत्र्यदिवस | (ब्रिटनपासून) जुलै ४,१७७६ (घोषित) सप्टेंबर ३, १७८३ (मान्यता) |
||||
| प्रजासत्ताक दिन | - | ||||
| राष्ट्रीय भाषा | - | ||||
| इतर प्रमुख भाषा | इंग्लिश | ||||
| राष्ट्रीय चलन | अमेरिकन डॉलर (USD) | ||||
| राष्ट्रीय प्राणी | - | ||||
| राष्ट्रीय पक्षी | गरूड | ||||
| राष्ट्रीय फूल | - | ||||
| क्षेत्रफळ एकूण– पाणी– |
३वा क्रमांक ९६,३१,४२० वर्ग किमी |
||||
| लोकसंख्या एकूण– घनता– |
३वा क्रमांक २९,९१,०२,६६१ ३१ प्रती वर्ग किमी |
||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +१ | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .us, .gov, .edu, .mil, .um | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (GDP) |
१वा क्रमांक १२.२८ निखर्व अमेरिकन डॉलर |
||||
| वार्षिक दरडोई उत्पन्न (GDP per capita) |
३वा क्रमांक ४१,३९९ अमेरिकन डॉलर |
||||
उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने या नावाने ओळखला जातो.
अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो.भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.
अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वात आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे.
अमेरिकन डॉलर अमेरिकेचे चलन आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या.
१९ नोव्हेंबर १४९३ रोजी ख्रिस्टोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरीत होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळे व युरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९० टक्के मूळचे अमेरिकन लोक मरण पावले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले.
४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.
अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागली होती. सुरुवातीला पूर्व किनार्यावरील १३ राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे प्रसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चीनी स्थलांतरीत व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून उदयास आला.
याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धिने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्न धान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकाची भरभराट होऊ लागली. एवढ्या मोठ्या भूभागावर कामासाठी माणसे कमी पडत म्हणून अफ्रिकेतून गुलाम आणण्याची पद्दत सुरू झाली. प्रत्येकाला काम व स्वता:ची जमीन या आशेने असाम्राज्यवादी युरोपीय देशातूनही मोठ्याप्रमाणावर अमेरिकेत स्थलांतर सुरू झाले. अश्या प्रकारे अमेरिका हा एक स्थलांतरितांचा देश बनला.
१८६० च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा दक्षिणेकडीन शेतीप्रधान राज्यांनी कडवा विरोध केला व अमेरिकेपासून वेगळे असे स्वतंत्र राज्यांमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. शेतीप्रधान मालावर ब्रिटन व फ्रान्ससारखे देश गरजू असल्याने ते युद्धात आपल्याला मदत करतील असा अंदाज होता. अब्राहम लिंकनच्या सरकारने देशाची फाळणी वाचवण्यासाठी हा विरोध सशस्त्र मोडून काढण्याचे ठरवले. याचा परिणीती मानवी इतिहासातील सर्वाधिक रंक्तरंजीत गृहयुद्धात झाली. याला अमेरिकन गृहयुद्ध असे म्हणतात.अमेरिकन गृहयुद्धात प्रचंड जीवीत हानी झाली. हे युद्ध उत्तरेकडील राज्ये विरुद्ध दक्षिणेकडील राज्ये असे लढले गेले. रॉबर्ट लींच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडील राज्यांनी सामर्थ्यशाली उत्तरेला जबरदस्त आव्हान दिले. जवळपास १० लाख लोक या युद्धात कामी आले. उत्तरेने शेवटी या युद्धात नियंत्रण मिळवून हे बंड मोडून काढले. अब्राहम लिंकन यांची काही काळाने हत्या झाली. युद्धानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आले. गुलामगीरी हळूहळू सर्व राज्यात संपवण्यात आली. युरोप प्रमाणेच अमेरिकेने औद्योगिकरण ,शास्त्रीय व सामाजिक सुधारणांचा अंगिकार करून झपाट्याने आर्थिक प्रगती केली.
[संपादन] प्रशासकीय संरचना
[संपादन] राष्ट्राध्यक्ष
५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिका) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यात विभागित केलेली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (काँग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रीप्रेझेंटेटिव्हस्' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रीप्रेझेंटेटिव्हस'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत.
प्रत्येक राज्यातील सगळी मते एकाच उमेदवारास मिळतात (काही अपवाद वगळता). ही मते मिळविण्यासाठी उमेदवारास त्या राज्यात साधे बहुमत मिळवावे लागते.
राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल ४ वर्षे असून, राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदावर दोन पूर्ण कार्यकालाहून अधिक वेळ राहू शकत नाही.
[संपादन] काँग्रेस
अमेरिकन काँग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिका) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत.
काँग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहुतांश विषयांसंबंधीचे अधिकार काँग्रेसकडे असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कायदे संमत करणे, व्यापार, कर इत्यादींबाबत धोरणे निश्चित करणे, युध्द घोषणा करणे ह्यांचा समावेश होतो.
दोनही सभागृहांचे कार्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथील 'कॅपिटॉल' येथे आहे.
[संपादन] ५० राज्ये
संयुक्त अमेरिका देश ५० राज्यांमध्ये विभागला गेला आहे. ह्यांपैकी अलास्का व हवाई वगळता बाकी ४८ राज्ये एकसंध आहेत. डेलावेर हे संयुक्त अमेरिकेत (American Union) दाखल झालेले पहिले (७ डिसेंबर १७८७), तर हवाई हे ५०वे व शेवटचे (२१ ऑगस्ट १९५९) राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे सर्वात मोठे (६,६३६२६७ वर्ग मैल, १७,१७,८५४ वर्ग किमी) तर र्होड आयलंड हे सर्वात लहान (१,५४५ वर्ग मैल, ४,००२ वर्ग किमी) राज्य आहे. कॅलिफोर्निया हे सर्वात अधिक लोकसंख्येचे (३,६५,५३,२१५) तर वायोमिंग हे सर्वात कमी लोकसंख्येचे (५,२२,८३०) राज्य आहे.
| अलाबामा (AL) | अलास्का (AK) | ऍरिझोना (AZ) | आर्कान्सा (AR) | कॅलिफोर्निया (CA) |
| कॉलोराडो (CO) | कनेक्टिकट (CT) | डेलावेर (DE) | फ्लोरिडा (FL) | जॉर्जिया (GA) |
| हवाई (HI) | आयडाहो (ID) | इलिनॉय (IL) | इंडियाना (IN) | आयोवा (IA) |
| कॅन्सस (KS) | केंटकी (KY) | लुईझियाना (LA) | मेन (ME) | मेरीलँड (MD) |
| मॅसॅच्युसेट्स(MA) | मिशिगन (MI) | मिनेसोटा (MN) | मिसिसिपी (MS) | मिसूरी (MO) |
| माँटाना (MT) | नेब्रास्का (NE) | नेवाडा (NV) | न्यू हँपशायर (NH) | न्यू जर्सी (NJ) |
| न्यू मेक्सिको (NM) | न्यू यॉर्क (NY) | नॉर्थ कॅरोलिना (NC) | नॉर्थ डकोटा (ND) | ओहायो (OH) |
| ओक्लाहोमा (OK) | ओरेगॉन (OR) | पेनसिल्वेनिया (PA) | र्होड आयलंड (RI) | साउथ कॅरोलिना (SC) |
| साउथ डकोटा (SD) | टेनेसी (TN) | टेक्सास (TX) | युटा (UT) | व्हरमाँट (VT) |
| व्हर्जिनिया (VA) | वॉशिंग्टन (WA) | वेस्ट व्हर्जिनिया (WV) | विस्कॉन्सिन (WI) | वायोमिंग (WY) |
[संपादन] अर्थतंत्र
आजच्या घडीला अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वात बलाढ्य मानला जातो. देशाचा वार्षिक सकल उत्पन्नात पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगिकार करुन विज्ञान व तंत्रज्ञानात स्वता:ला अग्रेसर ठेवले आहे. आजच्या घडीला सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २० व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शावतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची भांडवलशाही (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तिजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये सबप्राईम संकटानंतर लेहमन ब्रदर्स या मोठ्या कंपनीने दिवाळखोरे जाहिर केले व त्यानंतर आलेल्या मंदिने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य विम्याच्या बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात बेकारी व चिंतेचे वातावरण आहे.
वाहन उद्योग हा अमेरिकेतील सर्वात मोठा उद्योग आहे. दर-माणशी ०.७५ वहाने हे अमेरिकेतील वाहनांचे प्रमाण आहे जे जगात सर्वाधिक आहे[१]. गाड्यांचा खप वाढण्यामागे या देशाचा प्रचंड आकार कारणीभूत आहे. राज्यांचे आकार व शहरांचे अंतर प्रचंड असल्याने युरोपसारखी सार्वजनीक दळणवळणाची साधने अमेरिकेत विकसित झाली नाहीत. अंतरे प्रचंड व हवामान थंड असल्याने विसाव्या शतकात गाड्यांचा खप प्रचंड वाढला जो आजतागायत आहे. फोर्ड, जनरल मोटोर्स हि अमेरिकन उत्पादने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत जर्मन व जापानी गाड्यादेखील चांगल्याच खपतात. वाहन उद्योगाखालोखाल युद्ध सामग्री हा अमेरिकेतील सर्वात जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. दुसर्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध सामरिक वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात संशोधन करुन विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, क्षेपणास्त्रे, विमाने, युद्धनौका, पाणबुड्या यांच्यात शोध लावत वर्चस्व प्रस्थापित केले जे नजीकच्या काळात कोणाला मिळवता येईल असे दिसत नाही. शस्त्रांस्त्रांचा अमेरिका जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे.
[संपादन] वस्तीविभागणी
अमेरिकेच्या जनगणना संस्थेच्या अंदाजानुसार अमेरिकेची लोकसंख्या ३०,६३,६०,००० इतकी आहे.[२] पैकी १ कोटी १२ लाख व्यक्ती अनधिकृतरीत्या तेथे राहतात.[३] लोकसंख्येनुसार अमेरिका चीन व भारतानंतर तिसर्या क्रमांकाचा देश आहे. येथील लोकसंख्यावृद्धीदर ०.८९% आहे.[४] जन्मदर दरहजारी १४.१६ आहे.[५] २००७च्या आर्थिक वर्षात १०,५०,००० व्यक्तींना अमेरिकेत कायम वास्तव्य करण्यास मुभा देण्यात आली. गेल्या वीस वर्षांत येथे स्थलांतरित होणार्यांत मेक्सिकोच्या नागरिकांचे बहुसंख्यत्व आहे. १९९८पासून भारत, चीन व फिलिपाईन्स येथूनही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.[६] जगातील प्रगत देशांतील अमेरिका एकमेव असा देश आहे ज्याची लोकसंख्या पुढील काही दशकांत वाढण्याचा अंदाज आहे.[७]
[संपादन] क्रीडा
१९ व्या शतकापासून बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल व बर्फावरील हॉकी हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय व्यावसायिक खेळ आहेत. सध्या कॉलेज फुटबॉल व कॉलेज बास्केटबॉल हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे,[८] बॉक्सिंग व घोड्यांची शर्यत हे एकेकाळी व्ययक्तीक खेळातील सर्वाधिक लोकप्रिय होते परंतु हळूहळू त्यांची जागा गोल्फ व गाड्यांच्या रेसिंगने घेतली आहे. युरोपातील फुटबॉल जो अमेरिकेत सॉकर म्हणून ओळखला जातो त्यामानाने कमी लोकप्रियता आहे व प्रामुख्याने युवा खेळांडूंमध्ये खेळला जातो. टेनिसची पण लोकप्रियता बरीच आहे.
अमेरिकेतील बर्याचश्या खेळांचे मूळ युरोपीय खेळांमध्ये आहे. परंतु बास्केटबॉल, व्हॉलीबॉल स्केटबोर्डींग, स्नोबोर्डींग चिअरलीडींग हे अमेरिकेत जन्मलेले खेळ आहेत. सर्फिंग हा खेळ अमेरिकेत युरोपीय लोक येण्याआगोदर अस्तित्वात होता. अमेरिकेत आजवर सर्वात जास्त आठ ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत व अमेरिकेनेच सर्वात जास्त आजवर कोणत्याही देशापेक्षा जास्त पदके मिळवली आहेत. [९] तर हिवाळी ऑलिंपिक मध्ये २१६ पदके मिळवली आहेत व सद्यस्थितीत दुसर्या क्रमांकावर आहे..[१०]
[संपादन] पर्यटन स्थळे
[संपादन] बाह्यदुवे
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
- ↑ दरडोई वहाने देशाप्रमाणे
- ↑ U.S. POPClock Projection. U.S. Census Bureau].
- ↑ Camarota, Steven A., and Karen Jensenius (July 2008). Homeward Bound: Recent Immigration Enforcement and the Decline in the Illegal Alien Population. Center for Immigration Studies. बघितले 2008-08-06 ला.
- ↑ European Union. The World Factbook. CIA (2007-05-31). बघितले 2007-06-15 ला.
- ↑ Rank Order—Birth Rate. The World Factbook. CIA (2007-05-31). बघितले 2007-06-13 ला.
- ↑ Persons Obtaining Legal Permanent Resident Status by Region and Country of Birth: Fiscal Years 1998 to 2007 (Table 3). U.S. Dept. of Homeland Security. बघितले 2008-09-06 ला.
- ↑ Executive Summary: A Population Perspective of the United States. Population Resource Center (May 2000). Archived from the original on 2007-06-04. बघितले 2007-12-20 ला.
- ↑ Krane, David K. (2002-10-30). Professional Football Widens Its Lead Over Baseball as Nation's Favorite Sport. Harris Interactive. बघितले 2007-09-14 ला. Maccambridge, Michael (2004). America's Game: The Epic Story of How Pro Football Captured a Nation. New York: Random House. ISBN 0375504540.
- ↑ All-Time Medal Standings, 1896–2004. Information Please. बघितले 2007-06-14 ला. Distribution of Medals—2008 Summer Games. Fact Monster. बघितले 2008-09-02 ला.
- ↑ All-Time Medal Standings, 1924–2006. Information Please. बघितले 2007-06-14 ला. Norway is first; the Soviet Union is third, and would be second if its medal count was combined with Russia's.
