फुटबॉल
आक्रमक खेळाडू (क्र.१०) गोल करण्याच्या प्रयत्नात |
|
| सर्वोच्च संघटना | फिफा |
|---|---|
| उपनाव | असोशिएशन फुटबॉल, सॉकर, फुटी, "द ब्युटीफुल गेम", "द वर्ल्ड गेम" |
| सुरवात | मध्य १९ वे शतक ब्रिटन |
| माहिती | |
| कॉन्टॅक्ट | हो |
| संघ सदस्य | ११ खेळाडू संघागणिक |
| मिश्र | हो, स्वतंत्र स्पर्धा |
| वर्गीकरण | सांघिक खेळ, चेंडू खेळ |
| साधन | फुटबॉल |
| मैदान | फुटबॉल मैदान |
| ऑलिंपिक | इ.स. १९०० |
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक होय.
अनुक्रमणिका |
खेळाचे स्वरूप[संपादन]
हा खेळ एका गोलाकृती चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. नव्वद मिनिटांचा एक सामना असतो. सामन्यात ४५ मिनिटांनंतर १५ मिनिटे कालावधीचा मध्यंतर होतो.
महत्त्वाच्या संघटना[संपादन]
- फिफा : फेदेरात्सिओन इंटरनात्सिओनाल दे फुटबॉल आसोसिआत्सिओन
- युएफा : युनिअन युरोपिअन दे फूटबॉल असोसिएशन
मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]
राष्ट्रांतर्गत/आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- फिफा - अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, पोर्तुगीज व अरबी मजकूर)
- फिफा - खेळाचे वर्तमान नियम (इंग्लिश मजकूर)
|
|||||||||||||||||||||||||||||