उद्धव ठाकरे
| उद्धव ठाकरे | |
|---|---|
इ.स. २००९ सालच्या फिलाडेल्फिया, अमेरिका येथील बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाच्या प्रसंगी उद्धव ठाकरे |
|
| जन्म | उद्धव बाळासाहेब ठाकरे २७ जुलै, इ.स. १९६० |
| पेशा | राजकारण, छायाचित्रण |
| राजकीय पक्ष | शिवसेना |
| धर्म | हिंदू धर्म |
| जोडीदार | रश्मी ठाकरे |
| अपत्ये | आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे |
| वडील | बाळासाहेब ठाकरे |
| आई | मीनाताई ठाकरे |
| नातेवाईक | राज ठाकरे (चुलतभाऊ) |
| संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश व मराठी मजकूर) |
|
उद्धव ठाकरे (२७ जुलै, इ.स. १९६० - हयात) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, छायाचित्रकार आहेत. इ.स. २००३ साली उद्धव ठाकऱ्यांचे वडील - शिवसेना-संस्थापक व तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे - यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकऱ्यांकडे आली.
राजकीय कारकीर्द [संपादन]
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला जयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली[ संदर्भ हवा ]. उद्धव ठाकरे व त्यांचे चुकतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकऱ्यांनी शिवसेना सोडली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली [ संदर्भ हवा ].
बाह्य दुवे [संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ. १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (इंग्लिश व मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |