टाटा मोटर्स
टाटा मोटर्स ही भारतातील सर्वांत मोठी व्यावसायिक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी असून विविध प्रकारचे ट्रक हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. मागील १५ ते २० वर्षात टाटा मोटर्सने लहान व मध्यम गाड्यांमध्ये लाक्षणीक झेप घेतली आहे. या कंपनीने जगातील सर्वांत स्वस्त गाडी बनवण्याचा ध्यास घेतला असून. टाटा नॅनो १ लाख रुपयात सर्व सामान्यांसाठी चारचाकी गाडी असे सादरीकरण केले आहे. यामुळे प्रथमच भारतीय वाहननिर्मितीची आंतराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद दखल घेतली गेली. तसेच प्रसिद्ध लँड रोव्हर व जॅग्वार ह्या ब्रिटीश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतल्या त्यामुळे टाटा मोटर्स या कंपनीचा व भारताचा आंतराष्ट्रीय वाहन निर्मितीत भारताचा दबदबा वाढला. या कंपनीचा पुणे येथे मोठा कारखाना आहे. किंबहुना पुणे शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख होण्यास या कंपनीचा मोठा वाटा आहे. तसेच जमशेदपूर येथेही कारखाना आहे. नॅनोसाठी पश्चिम बंगालमध्ये सिंगूर येथे या कंपनीने घेतलेल्या जागेवर २००७-०८ मध्ये बरेच आंदोलन झाले व टाटा मोटर्स यामुळे माध्यामांमध्ये चर्चेत होता.
अनुक्रमणिका |
[संपादन] उत्पादने
- टाटा सिएरा
- टाटा इस्टेट
- टाटा सुमो
- टाटा सुमो ग्रॅंडे
- टाटा सफारी
- टाटा इंडिका
- टाटा इंडिका व्हिस्टा
- टाटा इंडिगो
- टाटा इंडिगो मरीना
- टाटा इंडिगो मान्झा
- टाटा विंगर
- टाटा मॅजिक
- टाटा नॅनो
- टाटा झेनॉन
- टाटा आरिया
- टाटा व्हेन्चर
- टाटा मॅजिक आयरिस
[संपादन] कनसेप्ट वाहने
- २००० आरिया रोडस्टार
- २००१ आरिया कूप
- २००२ टाटा इंडिका
- २००४ टाटा इंडिगो एडवेन्ट
- २००५ टाटा होवर
- २००६ टाटा क्लिफराईडर
- २००७ टाटा एलेगेन्ट
- २००९ टाटा प्र१मा
- २०१० टाटा व्हर्सा
- २०१० टाटा इसोटा
- २०११ टाटा पिक्सल
- २०११ टाटा सनी
[संपादन] व्यवसायिक वाहने
- टाटा एस
- टाटा टीएल/टेलीकोलीन/207 डीआई पिकअप ट्रक
- टाटा 407 Ex and Ex2
- टाटा 709 Ex
- टाटा 809 Ex and Ex2
- टाटा 909 Ex and Ex2
- टाटा 1109 (मध्यम ट्रक)
- टाटा 1510/1512 (मध्यम बस)
- टाटा 1610/1616 (भारी बस)
- टाटा 1613/1615 (मध्यम truck)
- टाटा 2515/2516 (मध्यम ट्रक)
- टाटा 3015 (भारी ट्रक)
- टाटा 3516 (भारी ट्रक)
- टाटा नोवस (भारी ट्रक टाटा देवूद्वारा डिजाईन किया गया)
[संपादन] सैन्य वाहने
- टाटा 407 ट्रुप कैरियर,
- टाटा एलपीटीए 713 TC (4x4)
- टाटा एलपीटी 709 ई
- टाटा एसडी 1015 टीसी (4x4)
- टाटा एलपीटीए 1615 टीसी (4x4)
- टाटा एलपीटीए 1621 टीसी (6x6)
- टाटा एलपीटीए 1615 टीसी (4x2)
[संपादन] इतर
[संपादन] इतर प्रसिद्ध ब्रँड
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
- ↑ http://www.addict3d.org/news/130325/Tata+Motors+building+an+Air+Car?.html , http://www.nytimes.com/2007/10/12/business/worldbusiness/12cars.html?pagewanted=2&_r=2