परभणी जिल्हा
| परभणी जिल्हा परभणी जिल्हा |
|
|---|---|
|
महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्हाचे स्थान |
|
|
|
|
| राज्य | महाराष्ट्र, |
| विभागाचे नाव | औरंगाबाद विभाग |
| मुख्यालय | परभणी |
|
|
|
| क्षेत्रफळ | ६,२५०.५८ कि.मी.² |
| लोकसंख्या | १८,३५,९८२ (२०११) |
| लोकसंख्या घनता | २९३/किमी² |
| साक्षरता दर | ७५.२२% |
| लिंग गुणोत्तर | १.०६ ♂/♀ |
|
|
|
| जिल्हाधिकारी | डॉ.एस.डी.वानखेडे |
| लोकसभा मतदारसंघ | परभणी (लोकसभा मतदारसंघ) |
| खासदार | गणेशराव दुधगांवकर |
|
|
|
| संकेतस्थळ | |
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच परभणी प्रथम निझामच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेछ शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म पाथ्री येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी) व संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूर्वि परभणीत होते,आता ते हिगोली जिल्हयात आहे.
[संपादन] जिल्ह्यातील तालुके
[संपादन] संदर्भ
|
|||||||||||||||||||||||||
मानवत तालुकयाचे प्राचिन नाव मनिपुर हे होते