साचा चर्चा:महाराष्ट्र - जिल्हे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साचा चर्चा:महाराष्ट्रातील जिल्हे या पानावरून पुनर्निर्देशित)

जुन्या साच्याप्रमाणे विभागवार वर्गवारी[संपादन]

या साच्याच्या प्रस्तुत आवृत्तीत (18:35, 1 डिसेंबर 2006) जिल्ह्यांची विभागवार वर्गवारी काढून टाकण्यात आली असे दिसते. ती वर्गवारी भौगोलिक सलगता, प्राशासनिक विभाग यासारख्या माहितीच्या दृष्टीने उपयोगी होती. ती नव्या रूपामध्येदेखील अंतर्भूत करावी असे वाटते.

--संकल्प द्रविड 13:28, 1 डिसेंबर 2006 (UTC)

मी इंग्रजी विकिपीडियाचाच क्रम घेतला. कुठल्या क्रमाने असावे असं तुम्हाला वाटते? चुकीबद्दल क्षमस्व.महाराष्ट्र एक्सप्रेस 13:32, 1 डिसेंबर 2006 (UTC)

या साच्यात मी केलेला बदल उलटवण्यात आला आहे. मी केलेल्या बदलात काय चूक होती आणि नावाचे आद्याक्षर आणि आडनाव याच पद्धतीने का लिहायचे याचा खुलासा बदल उलटवणारे करतील काय? मी बदल करण्याचे कारण - महाराष्ट्रात, जिथे मराठी विकिपिडाया सर्वाधकि वापरला जाण्याची शक्यता आहे, मराठी नावाचे आद्याक्षर आणि आडनाव अशी नावे लिहीण्याची पद्धत नाही, आणि ही सगळी महाराष्ट्रातल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांची, लोकशाही पद्धतीने नियुक्त राज्याच्या सर्वोच्च पदाधिकारी पदावरील व्यक्तिची नावे आहेत. -मनोज १९:१९, २७ सप्टेंबर २०१० (UTC)

तुम्ही केलेल्या बदलात चूक नव्हती, तर त्यात अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तुमचा बदल उलटवून करणे सोपे पडले असते म्हणून बदल उलटवले.
सहसा साचे हे शक्यतो छोटे असावे म्हणजे पानावरील कमीतकमी जागेत जास्तीत जास्त माहिती पुरवता येते. आताच्या आवृत्तीत मुख्यमंत्र्यांची शेवटची नावे ठेवली आहेत व जेथे द्विधा होईल तेथे आद्याक्षर (यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, इ) ठेवले म्हणजे वाचकाला या व्यक्ती वेगवेगळ्या असल्याचे कळावे.
या नावांच्या दुव्यावर टिचकी मारली असता योग्य त्या पानावर जाता येते. मुख्यमंत्री असण्या/नसण्याचा यात संबंध नाही.
अभय नातू १९:५७, २७ सप्टेंबर २०१० (UTC)