पेशवे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती.
अनुक्रमणिका |
[संपादन] पेशव्यांची कारकीर्द
[संपादन] श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशवे
श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता:
- बाळाजी विश्वनाथ पेशवे (इ.स.१७१४-१७२०)
- पहिले बाजीराव पेशवे (इ.स.१७२०-१७४०)
- बाळाजी बाजीराव पेशवे ऊर्फ नानासाहेब पेशवे (इ.स.१७४०-१७६१)
- माधवराव बल्लाळ पेशवे (इ.स.१७६१-१७७२)
- नारायणराव पेशवे (इ.स.१७७२-१७७४)
- रघुनाथराव पेशवे (अल्पकाळ)
- सवाई माधवराव पेशवे (इ.स.१७७४-१७९५)
- दुसरे बाजीराव पेशवे (इ.स.१७९६-१८१८)
- दुसरे नानासाहेब पेशवे (गादीवर बसू शकले नाहीत)
[संपादन] पेशवाईतील स्त्रिया
- आनंदीबाई: रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पत्नी, ओकांचे कन्या
- गंगाबाई: नारायणराव पेशव्यांची पत्नी, कृष्णाजी हरी साठे यांची कन्या
- गोपिकाबाई: बाळाजी बाजीराव यांची पत्नी, रास्त्यांची कन्या
- पार्वतीबाई: सदाशिवरावभाऊंची पत्नी
- यशोदाबाई: सवाई माधवरावांची दुसरी पत्नी
- रमाबाई: सवाई माधवरावांची पहिली पत्नी, थत्ते यांची कन्या
- रमाबाई: थोरले माधवराव पेशवे यांची पत्नी, सोलापूरकर यांची कन्या; ही सती गेली.
- लक्ष्मीबाई: विश्वासराव यांची पत्नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.
दुसरे बाजीराव यांना ११ बायका होत्या, त्या अशा:
- भागवतांची कन्या भागीरथीबाई
- मंडलीक यांची कन्या (थोरल्या)सत्यभामाबाई
- फडके यांची कन्या राधाबाई
- वाईकर रास्ते यांची कन्या वाराणशीबाई
- हरिभाऊ देवधर यांची कन्या कुसूबाई
- पेंडसे यांची कन्या सरस्वतीबाई
- अभ्यंकर यांची कन्या (धाकट्या)सत्यभामाबाई
- मराठे यांची कन्या लक्ष्मीबाई
- रिसबूड यांची कन्या गंगाबाई
- आठवले यांची कन्या
- गोखल्यांची मुलगी.
[संपादन] हेसुद्धा पाहा
|
|||||||||||||