धुळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख धुळे शहराविषयी आहे. धुळे जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
धुळे
जिल्हा धुळे जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ८,४१,४७३
२०११
दूरध्वनी संकेतांक ०२५६
टपाल संकेतांक ४२४***
वाहन संकेतांक MH-१८


धुळे हे धुळे जिल्ह्याचे आणि उत्तर महाराष्ट्राचेप्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहराची लोकसंख्या ८,३३,९८० (२०११ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या शहरातून महत्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू/कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि कर. ६ जातो. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनाजवळ चाळीसगाव नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो. जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. धुळे शहर भारतातील प्रमुख १३ महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती एकविरा देवी साठी प्रसिद्ध आहे.

[संपादन] भौगोलिक माहिती

धुळे शहर २०.९°उ. ७४.७८°पू. वर वसलेले आहे. शहराची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची २४० मीटर (७८७ फूट) आहे. शहराचा विस्तार १२० किमी आहे. धुळे शहर पांझरा नदीच्या तीरावर वसले आहे.


हेसुद्धा पहा

[संपादन] बाह्य दुवे

[संपादन] संदर्भ

इंग्रजी विकिपीडिया- Dhule

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये