पर्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पर्वती टेकडीचे पायथ्यानजीकच्या निवासी उपनगरातून घेतलेले प्रकाशचित्र (इ.स. २००८च्या सुमारास)

पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक टेकडी आहे. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, इ.स. १७४९ रोजी हे मंदिर उभे राहिले [१].

अन्य मंदिरे[संपादन]

पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. पानिपताच्या तिसर्‍या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१मध्ये येथील होमशाळेत झाले[१].

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ दीक्षित,म.श्री. (इ.स. २००१). असे होते पुणे. उत्कर्ष प्रकाशन, पुणे, पृ. ४९. (मराठी मजकूर) 

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.