हैदराबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?तेलुगू : హైదరాబాదు , उर्दू: حیدر آباد
हैदराबाद
आंध्र प्रदेश • भारत
चारमीनार
चारमीनार
गुणक: 17°21′58″N 78°28′34″E / 17.366, 78.476
प्रमाणवेळ IST (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
समुद्री किनारा
६२५ km² (२४१ sq mi)
• ५३६ m (१,७५९ ft)
• ० km (० mi)
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
Aw (Köppen)
• ८०३ mm (३१.६ in)
२६.० °C (७९ °F)
• २३.५ °C (७४ °F)
• ३०.३ °C (८७ °F)
अंतर
दिल्ली पासुन
• मुबंई पासुन
चेन्नई पासुन

• १,४९९ km द (जमीनी)
• ७११ km आग्नेय (जमीनी)
• ६८८ km उ (जमीनी)
प्रांत तेलंगाणा
जिल्हा हैदराबाद
लोकसंख्या
घनता
मेट्रो
लिंग गुणोत्तर
३,६३२,०९४ (इ.स. २००६)
• ५,८११/km² (१५,०५०/sq mi)
• ६,११२,२५० (6) (इ.स. २००६)
• १.०७
भाषा तेलुगू, उर्दू
महापौर थीगाला कृष्ण रेड्डी
आयुक्त संजय जाजु
स्थापित इ.स. १५९१
सासंदीय मतदारसंघ हैदराबाद
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• ५०० XXX
• +40
• INHYD
• AP9, AP10, AP11, AP12, AP13, AP28, AP29
संकेतस्थळ: हैदराबाद महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 17°21′58″N 78°28′34″E / 17.366, 78.476

'हैदराबाद उच्चार ऐका  ( तेलुगू: హైదరాబాదు , उर्दू: حیدر آباد)': हे भारतातील आंध्र प्रदेश राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. हैदराबादची २००६ ची प्रस्तावित लोकसंख्या ६७ लाख आहे तर सिकंदराबाद या जु्ळ्या शहरासह हैदराबाद महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ९० लाख असल्याचे मानले जाते. मोत्यांचे शहर अशी ओळख असलेल्या या शहराला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय वारसा लाभला आहे. एकवीसाव्या शतकात शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील आघाडीचे शहर म्हणून हैदराबाद मान्यता पावले आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

सन १५१२ मध्ये बहामनी साम्राज्यातून बंड करून किल्ले गोळकोंडा येथे कुतूबशाही ही राजेशाही स्थापन झाली. या परिवारातील राजा महंमद कुलीकुतूब शहा याने गोळकोंड्यातील पाण्याच्या प्रश्नावर तोडगा म्हणून जवळच मुसी नदीच्या किनारी हैदराबाद या शहराची स्थापना १५९१ मध्ये केली. त्यानेच शहरात चारमीनार या प्रसिद्ध वास्तूची उभारणी केली.

सन १६८७ मध्ये मुगल सम्राट औरंगजेबने हैदराबाद ताब्यात घेतले, मात्र शहरावर मुगल सत्ता फार काळ चालली नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेल्या संघर्षानंतर या प्रांताचा निजाम उल मुल्क (प्रांत प्रमुख) असलेल्या असफ जहा पहिला याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफजहाच्या पुढील सात वारसांनीही हैदराबादचे निजाम म्हणूनच राज्य केले. गोळकोंड्याहून राजधानी हैदराबादला स्थलांतरीत झाली. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले. निजामांकडची सत्ता आणि संपत्ती यांनी अनेक दंतकथांना जन्म दिला.

सन १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र पोलिस कारवाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ ला भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. भाषिक आधारावर संस्थानाच्या त्रिभाजनानंतर हैदराबाद शहर हे तेलुगू भाषिक तेलंगण भागासह आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आले. १ नोव्हेंबर १९५६ ला आंध्रप्रदेशची स्थापना झाली, नव्या राज्याच्या राजधानीचे शहर म्हणून हैदराबाद कायम राहिले.

[संपादन] भूगोल आणि वातावरण

समुद्रसपाटीपासून ५३६ मीटर उंचीवर वसलेले हैदराबाद शहर अनेक लहान मोठ्या टेकड्या आणि अग्निजन्य खडकांपासून बनलेले आहे.शहराचे समशीतोष्ण हवामान वर्षाचा बहुतेक काळ आल्हाददायक आहे. मूळ शहर ज्यात चारमीनार आणि मक्का मशीद येते, मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे.

[संपादन] उद्योगधंदे

हैदराबाद पारंपारिकरित्या लसूण आणि मसाल्याचे पदार्थ, नारळ, सुपारी, केळी आदी फळांची मोठी बाजारपेठ होती. आजचे हैदराबाद मात्र माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शिक्षण, मनोरंजन या क्षेत्रात देशातील आघाडीचे केंद्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांनी आपली महत्वाची कार्यालये येथे थाटली आहेत.

[संपादन] लोकसंख्या आणि लोकजीवन

शहराच्या सुमारे ९० लाख लोकसंख्येत हिंदू आणि इस्लाम धर्मीयांची संख्या जास्त आहे. माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगाच्या वाढीनंतर भारताच्या सर्व भागातून मोठ्या प्रमाणात लोक हैदराबादला येऊन वसत आहेत त्यामुळे शहराचे स्वरूप बहुभाषक बनते आहे. तेलुगू, उर्दू दखनी आणि हिंदी या शहराच्या मुख्य भाषा होत. याशिवाय गुजराती, राजस्थानी आणि मराठी भाषकांचीही संख्य शहरात मोठी आहे. तेलुगू आणि उर्दूचा येथील हिंदीवर मोठाच परिणाम झाला असून, ही शैली हैदराबादी हिंदी म्हणून ओळखली जाते. त्याशिवाय व्यापारउदीम, सरकारी कामकाजात इंग्रजीचाही वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.

शहराची देखभाल बृहत् हैदराबाद महानगरपालिका करते. तिचे लोकनियुक्त प्रमुख महापौर असतात,तर प्रशासकीय प्रमुख आयुक्त हे आयएएस दर्जाचे अधिकारी असतात.

आपल्या खास पद्धतीच्या पक्वान्नांसाठीही, विशेषतः मांसाहारी पक्वान्नांसाठी, हैदराबाद प्रसिद्ध आहे. हैदराबादी बिर्याणी हा पदार्थ जगभरात नवाजलेला आहे.

[संपादन] वाहतूक

हैदराबादेतील महात्मा गांधी बसस्थानक हे आशियातील पहिल्या पाच सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे. देशाच्या अनेक भागातून बस येथे येतात. हैदराबाद शहर आणि परिसरात आंध्रप्रदेश स्टेट रोड ट्रांसपोटर् कॉपोर्रेशन (एएसआरटीसी) या सरकारी महामंडळाच्या बसगाड्या धावतात. त्याशिवाय मीटरप्रमाणे पैसे घेऊन प्रवासी वाहतूक करणारे ऑटोरिक्षाही येथे मिळतात.

हेदराबाद शहरात लोकल रेल्वेसेवाही उपलब्ध आहे. हैदराबाद (नामपल्ली), काचिगुडा आणि सिकंदराबाद ही तीन प्रमुख रेल्वेस्थानके शहरात आहेत. हैदराबादच्या जुळ्या सिकंदराबाद शहरातच दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. रेल निलयम या संकुलात ते वसलेले आहे. देशाच्या सर्व भागात जाण्यायेण्यासाठीही रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

हैदराबादेत मार्च २००८ मध्ये शमशाबाद येथे एक नवा अत्याधुनिक विमानतळ कार्यरत झाला. यापूर्वीचा बेगमपेट विमानतळ वाढत्या हवाई वाहतूक गरजांसाठी अपुरा पडू लागल्यानंतर हा नवा विमानतळ बांधून कार्यरत करण्यात आला. देशाच्या सर्व भागात तसेच पश्चिम आशिया, आग्नेय आशियासह जगाच्या अनेक भागात हैदराबादहून थेट विमानसेवा उपलब्ध आहेत.

[संपादन] हे सुद्धा पहा

वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये