बंगळूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?बंगळूर
कर्नाटक • भारत
—  मेट्रो  —
चित्रात वरून ,युबी सिटी,इन्फोसिस,लालबाग ग्लास हाऊस,विधान सौध,आणि खाली बागमाने टेकपार्क
चित्रात वरून ,युबी सिटी,इन्फोसिस,लालबाग ग्लास हाऊस,विधान सौध,आणि खाली बागमाने टेकपार्क
गुणक: 12°58′13″N 77°33′37″E / 12.970214, 77.56029
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
७४१ चौ. किमी (२८६ चौ. मैल)
• ९२० m (३,०१८ ft)
प्रांत बायालु सीमे
जिल्हा बंगळूर शहर
लोकसंख्या
घनता
मेट्रो
५२,८०,००० (३ रा) (२००७)
• ७,१२६/km² (१८,४५६/sq mi)
• ५
आयुक्त डॉ.एस. सुब्रमन्या
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• ५६०
• +80
• INBLR
• KA 01, KA 02, KA 03, KA 04, KA 05, KA 41, KA 50, KA 51, KA 53
संकेतस्थळ: बंगळूर महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 12°58′13″N 77°33′37″E / 12.970214, 77.56029 बंगळूर (कन्नड: ಬೆಂಗಳೂರು ; रोमन लिपी: Bengaluru / Bangalore, बेंगलुरू / बँगलोर) भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ साली कर्नाटक राज्यशासनाने याचे नाव बदलून बंगळूरू असे ठेवले. याचे नाव पूर्वी बेंड-काल-उरू असे होते. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगळुराचा लौकिक आहे. हे शहर बंगळूरबंगळूर ग्रामीण अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.

बंगळूर भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळ्खले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत.

इतिहास[संपादन]

१८८७ साली ब्रिटिशानी बंगळूर पॅलेस बांधला

बेंगळूरूचा उल्लेख इ.स.च्या नवव्या शतकातील एका शिलालेखात आढळतो, इ.स. १०२४ च्या काळात चोळ साम्राज्यात हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर होयसाळ, विजयनगर साम्राज्य इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. खरी सुरुवात इ.स. १५३७ साली पहिला केंपेगौडा यांने चिकलीदुर्ग आणि बसवणगुडी येथे मंदिर बांधून केली. दुसर्‍या केंपेगौडाने ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. इ.स. १६३८ साली रणदुल्ला खान आणि शहाजीराजे भोसले यांनी तिसर्‍या केंपेगौडास हरवून बंगळूर आदिलशाही मुलखास जोडले. शहाजीराजांना बंगळूर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिकपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. इ.स. १६८७ साली कासिम खानाने मुघलांचे सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र व्यंकोजी भोसले याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासिम खानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख म्हैसूरचा राजा चिक देवराजा वोडेयार याला विकली. दुसर्‍या कृष्णराज वोडेयाराच्या मृत्यूनंतर बंगळुराची जहागीर त्याचा सुभेदार हैदर अली याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. इ.स. १७९१ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हैदर अलीचा पुत्र टिपू सुलतान यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.

भूगोल[संपादन]

उल्सूर लेक

बंगळूर कर्नाटक राज्याच्या दक्षिण-पूर्व कडे स्थित आहे. समुद्रसपाटीपासून ९२० मी (३,०१८ फूट) उंचीवर आहे. बंगळूर मध्ये नदी अशी नाही, पण बरीच तळी आहेत. इ.स.च्या सोळाव्या शतकात बंगळुराचा शासक केंपेगौडा याने शहराचा पाणी समस्येवर उपाययोजनेसाठी तळी निर्मिली.

बंगळूर शहरातील तळी[संपादन]

 • उल्सूर तलाव
 • बेलंदूर तलाव
 • मडिवळा तलाव
 • लालबाग तलाव
 • पुटेनहल्ली तलाव
 • जागरणहल्ली तलाव
 • आगरा तलाव

हवामान[संपादन]

बेंगळूर समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे, येथील हवामान आल्हाददायक व अनुकूल आहे. जानेवारी हा सगळ्यात थंड महिना असतो, तर एप्रिल उष्ण असतो. बंगळुराचे सर्वोच्च तापमान ३८.९°सेल्सियस इ.स. १९३१ साली नोंदले गेले, तर नीचांकी तापमान ७.८ °सेल्सियस इ.स. १८८४ साली नोंदले गेले.

अर्थकारण[संपादन]

बेंगळूर हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. वालचंद हिराचंद यांनी इ.स. १९४० साली बंगळुरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी स्थापली. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मूवर, हिंदुस्तान मशीन टूल, नॅशनल एरोस्पेस इत्यादी कंपन्यांची केंद्रे येथे आहेत.

आय.टी.पी.एल. बेंगळूर

बंगळूर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. इ.स. १९८५ साली टेक्सास इंस्ट्रुमेंट्स कंपनीने येथे आऊटसोर्सिंग केंद्र उघडल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपली विकसन केंद्रे येथे उघडली. इन्फोसिस, विप्रो टेक्नॉलॉजीज इत्यादी प्रमुख भारतीय सॉफ्टवेर कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्यशासनाने सॉफ्टवेर तंत्रज्ञान उद्याने उघडून या उद्योगास चालना दिली आहे.

प्रशासन[संपादन]

प्रसारमाध्यमे[संपादन]

वाहतूक व्यवस्था[संपादन]

बी.एम.टी.सी. वोल्वो बस

रस्तेवाहतूक[संपादन]

मॅजेस्टिक हे मुख्य बस स्थानक आहे. शहरी वाहतुकीसाठी बंगळूर मेट्रोपीलिन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीची सुविधा आहे. ऑटोरिक्षा आणी खासगी बससेवाही प्रचलित आहेत.

रेल्वे वाहतूक[संपादन]

मुख्य रेलवे स्टेशन मॅजेस्टिकजवळ आहे.

विमान वाहतूक[संपादन]

बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून ४० कि.मी. अंतरावर आहे.

संस्कृती[संपादन]

खेळ[संपादन]

क्रिकेट हा बंगळुरातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. चिन्नस्वामी स्टेडीयममध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. येथून राहुल द्रविड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील जोशी, व्यंकटेश प्रसाद इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू भारतीय क्रिकेटजगतास लाभले आहेत.

पर्यटन[संपादन]

लाल बागेमधील काचघर
 • लाल बाग
 • कबन पार्क
 • विधान सौधा
 • नंदी मंदिर
 • बनेरघट्टा उद्यान
 • बंगळूर किल्ला
 • टिपू महाल
 • इस्कॉन मंदिर
 • वंडरला पार्क
 • नंदी हिल

शिक्षण संस्था[संपादन]

भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर

इ.स. १९०९ साली भारतीय विज्ञान संस्थेची स्थापना येथे झाली.

बंगळूर शहरातील उपनगरे[संपादन]

 • शिवाजीनगर
 • इंदिरानगर
 • डोमलूर
 • मल्लेशवरम
 • कोरमंगला
 • जयप्रकाश नारायण नगर
 • जयनगर
 • मारतहळ्ळी

मुख्य रस्ते[संपादन]

 • महात्मा गांधी रोड
 • ब्रिगेड रोड
 • विधान सौधा रोड


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.