भारतीय प्रमाणवेळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
भारताची प्रमाण-वेळ ही वेळ युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ अलाहाबाद वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता.
ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. अलाहाबाद शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्जरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते.
१५ एप्रिल २००६पासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले.