नांदेड जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नांदेड जिल्हा
नांदेड जिल्हा
MaharashtraNanded.png

महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्हाचे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय नांदेड
तालुके अर्धापूरभोकरबिलोलीदेगलूरधर्माबादहदगावहिमायतनगरकंधारकिनवटलोहामाहूरमुदखेडमुखेडनांदेड (तालुक्याचे ठिकाण) • नायगावउमरी

क्षेत्रफळ १०,४२२ कि.मी.²
लोकसंख्या ३३५६५६६ (२०११)
लोकसंख्या घनता ३२२/किमी²
साक्षरता दर ७६.९४
लिंग गुणोत्तर १.०६ /

जिल्हाधिकारी श्री. श्रीकार परदेशी
लोकसभा मतदारसंघ नांदेड (लोकसभा मतदारसंघ), हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)(काही भाग)
खासदार भास्करराव पाटील (खतगावकर), सुभाष वानखेडे
पर्जन्यमान ९५४ मिमी

संकेतस्थळ


हा लेख नांदेड जिल्ह्याविषयी आहे. नांदेड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेशकर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे.नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.

नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, मान्याद व पेनगंगा.नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते.

नांदेड जिल्ह्यातील तालुके- अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड (तालुक्याचे ठिकाण), नायगाव, उमरी

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), बिलोली मशिद, कंधारचा किल्ला, लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा, देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर (होट्ट्ल), नांदेडचा किल्ला व मुखेड येथील शिवमंदिर

संदर्भ[संपादन]