भौगोलिक गुणक पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पृथ्वीच्या नकाशावर अक्षांश व रेखांश

भौगोलिक गुणक पद्धती एखाद्या विशिष्ठ शहर, गाव, वसाहत इत्यादींचे पृथ्वीवरील अचुक स्थान दाखवण्यासाठी वापरण्यात येते.

[संपादन] अक्षांश - रेखांश

अक्षांश (Lattitude) हा आकडा एखाद्या स्थळाचे उत्तर-दक्षिण दिशांमधील स्थान दाखवण्यासाठी वापरण्यात येतो. विषुववृत्ताचा अक्षांश ० अंश (°) आहे, उत्तर धृवाचा अक्षांश ९०° उत्तर (N), तर दक्षिण धृवाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) आहे. ह्याचा अर्थ असा की पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनीटे व सेकंदांमध्ये करण्यात येते.

रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पूर्व-पश्चिम दिशांमधील स्थान दाखवण्यासाठी वापरण्यात येतो. लंडन शहराजवळील ग्रीनवीच ह्या ठिकाणी ०° रेखांश आहे. ह्याच्या पूर्वेकडील स्थळे ० ते १८०° पूर्व (E) तर पश्चिमेकडील स्थळे ० ते १८०° पश्चिम (W) रेखांशांवर स्थित आहेत.

अक्षांश व रेखांश वापरुन पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचुक स्थान निश्चित करता येते. पण ह्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासुनची उंची वा खोली ठरवता येत नाही.

यात १ = ६० मिनिट (६०') आणी १' = ६० सेकंद (६०") असे भाग असतात.

[संपादन] उदाहरणे