माधवराव पेशवे
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| थोरले माधवराव पेशवे | ||
|---|---|---|
| अधिकारकाळ | जुलै २७, १७६१ - नोव्हेंबर १८, १७७२ | |
| अधिकारारोहण | जुलै २७, १७६१ | |
| राजधानी | पुणे | |
| पूर्ण नाव | माधवराव बाळाजी भट (पेशवे) | |
| जन्म | फेब्रुवारी १६, १७४५ | |
| मृत्यू | नोव्हेंबर १८, १७७२ | |
| थेऊर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र | ||
| पूर्वाधिकारी | नानासाहेब पेशवे | |
| उत्तराधिकारी | नारायणराव पेशवे | |
| वडील | नानासाहेब पेशवे | |
| आई | गोपिकाबाई | |
| पत्नी | रमाबाई | |
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, (फेब्रुवारी १६, १७४५ - नोव्हेंबर १८, १७७२), हे मराठी राज्याचे पेशवे (पंतप्रधान) होते.
बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या युद्धात पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचें वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुध्दिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुध्दि ही त्याच्या अंगी होती.
अनुक्रमणिका |
शत्रूचा उठाव [संपादन]
पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठयांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाउन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांचे वैमनस्य आले,ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.
निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरावर स्वारी केली. या प्रसंगी हैदराने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.
या नंतर इ.स. १७७० मध्ये पुनः हैदरावर स्वारी केली.
इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदराने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदराने त्यास बंदीत टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा पेशव्यांस राग येऊन, त्याने निजामांशी दोस्ती करून हैदरावर स्वारी केली. तेव्हा हैदराने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहीरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यास २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्याने हैदरशी तह केला.
दिल्लीकडील राजकारण [संपादन]
पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडूण राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत. या वेळी मराठ्यांनी दुसरेहि एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स्. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाजीउद्दीन याने वजिराचे पद् बळकावून दुसरा अलमगीर यास तत्त्कावर बसविले. त्या वेळी अलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाअलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस ठाणे दिले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तक्तावर बसविले.
त्यावेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी [संपादन]
इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावला. तेव्हा त्याची सून अहिल्याबाई होळकर ही जहागिरीची व्यवस्था पाहू लागली. तिचा कारभार तिच्या प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे तिचे नाव उत्तर हिन्दुस्थानात अजून सर्वत्रांच्या तोंडी आहे.दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धि. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस ह अर्धा शहाणा मानला जाई. जिवा,सखा,विठा,नाना अशी संक्षेपीरुपे वापरली जात.
माधवरावांचा मृत्यू [संपादन]
इ.स. १७७२ मध्ये हैदरावरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडला. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन थेऊर येथे अद्याप आहे.
संदर्भ सूची [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
|
|||||||||||||
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||