पृथ्वीराज चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण

विद्यमान
पदग्रहण
नोव्हेंबर ११, इ.स. २०१०
राज्यपाल के. शंकरनारायणन
मागील अशोक चव्हाण
पुढील विद्यमान
मतदारसंघ कराड

जन्म मार्च १७, इ.स. १९४६ (1946-03-17) (वय  ६६)
राजकीय पक्ष काँग्रेस
पत्नी सत्‍वशीला चव्हाण
निवास सातारा, मुंबई
धर्म हिंदू

पृथ्वीराज चव्हाण (मार्च १७, इ.स. १९४६ - हयात) हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. १० नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. त्यांनी ११ नोव्हेंबर इ.स. २०१० रोजी पदाची शपथ घेतील.

पृथ्वीराज चव्हाण हे राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत.

[संपादन] जीवन

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. चव्हाणांनी बिट्स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती आहेत. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली.

[संपादन] कारकीर्द

  • इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ : सदस्‍य, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्‍ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्‍लागार समिती
  • इ.स. १९९२-९३ : सदस्‍य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समिती.
  • इ.स. १९९४-९५ : सदस्‍य, वित्‍त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्‍थायी समिती.
  • इ.स. १९९५-९६ : सदस्‍य, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्‍य, दुय्यम विधि-विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्‍लागार समिती.
  • इ.स. १९९६-९७ : सदस्‍य, ११ व्‍या लोकसभेचे उपमुख्‍य प्रतोद, लोकसभा कॉंग्रेस संसदीय पक्षाचे सदस्‍य, वित्‍त मंत्रालयाची सल्‍लागार समिती.
  • इ.स. १९९६-९८ : कॉंग्रेस संसदीय पक्षाचे सचिव,
  • इ.स. १९९८-इ.स. २००० : सदस्‍य, सार्वजनिक लेखा समिती
  • इ.स. २०००-इ.स. २००१ : प्रवक्‍ता, अखिल भारतीय राष्‍ट्रीय कॉंग्रेस.
  • एप्रिल इ.स. २००२ : राज्‍यसभेवर निवड.
  • एप्रिल इ.स. २००८ : राज्‍यसभेवर फेरनिवड, राज्‍यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्‍ती वेतन (अतिरिक्‍त कार्यभार).
  • इ.स. २००४-इ.स. २००९ व मे २००९ ते नोव्‍हेंबर इ.स. २०१० पर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे राज्‍यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्‍वतंत्र कार्यभार), भू-विज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्‍ती वेतन खात्‍यांचे राज्‍यमंत्री. हरियाणा आणि जम्‍मू-काश्‍मीर राज्‍याचे प्रभारी.
  • महाराष्‍ट्राचे २६ वे मुख्‍यमंत्री म्‍हणून दि. ११ नोव्‍हेंबर इ.स. २०१० रोजी शपथविधी.
  • दि. २८ एप्रिल इ.स. २०११ रोजी महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.
  • दि. ३० एप्रिल इ.स. २०११ रोजी विधानपरिषदेचे सदस्‍य म्‍हणून शपथ.
  • राज्‍यसभा सदस्‍यत्‍वाचा दि. ६ मे इ.स. २०११ रोजी राजीनामा.


मागील:
अशोक चव्हाण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नोव्हेंबर ११, इ.स. २०१० - विद्यमान
पुढील:
विद्यमान




वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये