प्रल्हाद केशव अत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(आचार्य अत्रे या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रल्हाद केशव अत्रे
पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे
जन्म ऑगस्ट १३, १८९८
सासवड, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून १३, १९६९
परळ (मुंबई),महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारतीय
भाषा मराठी
साहित्यप्रकार कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्‍हेचे पाणी (आत्मचरित्र)
अपत्ये शिरीष पै, मीना देशपांडे

प्रल्हाद केशव अत्रे (ऊर्फ आचार्य अत्रे; ऑगस्ट १३, १८९८ - जून १३, १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.

अनुक्रमणिका

[संपादन] कारकीर्द

[संपादन] पत्रकारिता

१९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ 'रत्नाकर' व १९२९ साली 'मनोरमा' ही मासिके सुरू केली. पुढे १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २, १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.

[संपादन] चित्रपट

१९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्य आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिकचर्स’ असे नाव बदलून घेतले. १९४० साली नवयुग पिचर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याल विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादमुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये