नारायण राणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नारायण राणे

कार्यकाळ
१ फेब्रुवारी, इ.स. १९९९ – १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९
मागील मनोहर जोशी
पुढील विलासराव देशमुख

कार्यकाळ
२० फेब्रुवारी, इ.स. २००९ – विद्यमान
मागील अशोक चव्हाण
पुढील विद्यमान

नारायण राणे (एप्रिल १०, इ.स. १९५२ - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गेले. त्यांचे पुत्र निलेश नारायण राणे हेदेखील राजकारणी आहेत.

[संपादन] राजकीय कारकीर्द

नारायण राणे हे सध्या (इ.स. २०११ साली) महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इ.स. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे[ संदर्भ हवा ].

मालवण या आपल्या स्थानिक मतदारसंघातून बहुमताधिक्याने निवडून आले.

[संपादन] संक्षिप्त कारकीर्द

  • इ.स. १९९६ : शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
  • इ.स. १९९९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
  • इ.स. २००५ : शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
  • इ.स. २००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.
  • इ.स. २००८ : प्रहार (वृत्तपत्र) सुरू केले.
  • इ.स. २००९ : पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागीतल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली.
  • इ.स. २००९ : महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.


मागील:
मनोहर जोशी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
फेब्रुवारी १, इ.स. १९९९ - ऑक्टोबर १७, इ.स. १९९९
पुढील:
विलासराव देशमुख




वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये