वडा-पाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Vadapav.jpg

वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बटाटेवडा असून मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते).

इतिहास[संपादन]

वडा-पावचा वडा पहिल्यांदा श्रीमंत माधवराव पेशवे (पहिले) यांच्या कारकिर्दीत बनविण्यात आला.

थोडक्यात कृती[संपादन]

वडा-पाव तळताना

ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत: वडा आणि पाव.[निःसंदिग्धीकरण आवश्यक]


वडा करण्याची सर्वसाधारण कृती:

उकडलेला बटाटा कुस्करुन, त्यात मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, हळद, कढीलिंब, वगैरे मिसळून, त्याला हिंग-मोहरीची फोडणी देतात. अशाप्रकारे तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पाण्याने पातळ केलेल्या चण्याच्या पिठात बुडवून त्यांना मध्यम गरम तेलात तळून वडे बनविले जातात. पाव सहसा घरात न बनवता बेकरीमधून आणला जातो. ह्या पावाची एक विशिष्ट चव असते.

वडापाव मिळण्याची लोकप्रिय ठिकाणे[संपादन]

हा क्रम फक्त नावानुसार आहे