वसंतराव नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Vasantrao naik.jpg

वसंतराव नाईक (जुलै १, इ.स. १९१३ - इ.स. १९७९) हे मराठी राजकारणी होते. डिसेंबर ५, इ.स. १९६३ ते फेब्रुवारी २०, इ.स. १९७५ कालखंडादरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. वसंतराव नाईककांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील महुली या छोट्याश्या खेड्यात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती.

भूषविलेली पदे[संपादन]

  • पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद
  • इ.स. १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर अामदार म्हणून निवड.
  • इ.स. १९५६ साली सहकारमंत्रिपदावर नियुक्ती.
मागील:
मारोतराव कन्नमवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
डिसेंबर ५, इ.स. १९६३फेब्रुवारी २०, इ.स. १९७५
पुढील:
शंकरराव चव्हाण