नाशिक विभाग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नाशिक विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
[संपादन] चतुःसीमा
या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग आणि गुजरात राज्य, पूर्वेस अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) आणि औरंगाबाद विभाग(मराठवाडा), उत्तरेस मध्य प्रदेश राज्य व दक्षिणेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र) आहेत.
[संपादन] थोडक्यात माहिती
- क्षेत्रफळ - ५७,२६८ किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - १,५७,७४,०६४
- जिल्हे - नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, अहमदनगर जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा
- साक्षरता - ७१.०२%
- ओलिताखालील जमीन : ८,०६० किमी²
- मुख्य पिके : द्राक्ष, कांदा, ऊस, ज्वारी, कापूस, नागली
|
|||||||||||||||||||||||||