शिवाजीराव निलंगेकर
| शिवाजीराव निलंगेकर पाटील | |
|
|
|
| कार्यकाळ ३ जून, इ.स. १९८५ – ६ मार्च, इ.स. १९८६ |
|
| मागील | वसंतदादा पाटील |
|---|---|
| पुढील | शंकरराव चव्हाण |
|
|
|
| जन्म | ९ फेब्रुवारी, इ.स. १९३१ निलंगा |
| राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
शिवाजीराव निलंगेकर पाटील (९ फेब्रुवारी, इ.स. १९३१ - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ३ जून, इ.स. १९८५ ते ६ मार्च, इ.स. १९८६ या कालखंडात ते महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारांवजा सगळ्यात छोटा कालखंड आहे.[१]
आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्टकेसात मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकरने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
[संपादन] संक्षिप्त परिचय
- भूषविलेली अन्य पदे : राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य. मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते.
- १९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद.
- सध्या आमदार. राजकीय वारसदार पुत्र कै. दिलीप हे आमदार होते.
- सून रुपाताई या लातूरच्या माजी खासदार.
- नातू संभाजी हे निलंग्याचे माजी आमदार. (आजोबांचा पराभव करून आमदारकी)
- मुख्यमंत्रीपदाचा कालावधी: ३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६ पक्ष : काँग्रेस
- पहिल्यांदा आमदार १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघ.
| मागील: वसंतदादा पाटील |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ३ जून, इ.स. १९८५ - ६ मार्च, इ.स. १९८६ |
पुढील: शंकरराव चव्हाण |
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
|
|||||