बाणेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाणेर हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. पूर्वी या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होत असे. 17 व्या शतकात कावजी कळमकर हे काशीवरून बाणेर येथे स्थायिक झाले त्यांनी तुकई मंदिर बांधले. बाणेरचा इतिहास श्रीराम व पांडवांच्य काळातील आहे. श्रीरामाच्या काळामध्ये श्रीरामाने बाणासुराचा वध याच गावामध्ये केला होता म्हणुन या गावाला बाणेर असे नाव पडले. त्याचेच दयोतक म्हणजेच बाणेर मधुन वाहणारी राम नदी आहे. पुर्वी या नदीच्या बाजुला अनेक कोरलेले दगड व खुणा होत्या त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या तसेच बाणेरच्या टेकडीवर पांडवकालीन लेणी आहे. याचाच अर्थ बाणेर गाव हे श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या चरणकमलाने पावन झालेले आहे. असे म्हटले जाते की ज्या गावाला टेकडी व नदी आहे ते गाव सर्व संपन्न असते त्या प्रमाणे बाणेर गावाला लागूनच तुकई टेकडी आहे व जवळच मुळा नदी आहे त्यामुळे बाणेर गाव संपन्न असे गाव आहे.