गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
Appearance
गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[१] एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.
इतिहास
[संपादन]पुणे शहराच्या इतिहासात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य यासाठी प्रोत्साहन देणारा हा गणपती असल्याने याला मानाचे तिसरे स्थान देण्यात आले आहे.[२] कुस्तीच्या आखाड्यातील सदस्यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीचा हा गणपती आहे असे मानले जाते.[३] १८८७ साली भिकू शिंदे,शेख कासम वल्लाद,नानासाहेब खासगीवाले यांनी हा उत्सव सुरू केला.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "'हे' आहेत पुण्यातील मानाचे पाच गणपती; असं दिमाखात झालं आगमन". लोकमत. 2021-09-10. 2021-09-17 रोजी पाहिले.
- ^ "मानाचे गणपती: कोणत्या गणपती मंडळाचा मान कितवा हे कसं ठरलं?".
- ^ "पुणे के 5 प्रसिद्ध गणपति, जानिए क्या है इनका इतिहास और क्यों है महत्व". टीव्ही९ भारतवर्ष (हिंदी भाषेत). 2022-08-31. 2022-09-04 रोजी पाहिले.
- ^ "गुरुजी तालीम गणपतीचा इतिहास". eSakal - Marathi Newspaper. 2023-09-21 रोजी पाहिले.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती | |
---|---|
कसबा गणपती • तांबडी जोगेश्वरी गणपती • गुरुजी तालीम गणपती • तुळशीबाग गणपती • केसरीवाडा गणपती • दगडूशेठ हलवाई गणपती |