"मकरसंक्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
[[चित्र:संक्रांत सुगड आणि वाण.jpg|इवलेसे|सुगड आणि वाणाचे साहित्य]]मकरसंक्रांत हा [[भारत|भारतातील]] [[पौष]] महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित [[सण]] आहे. दक्षिणी भारतात हा सण [[पोंगल]] या नावाने ओळखला जातो. |
[[चित्र:संक्रांत सुगड आणि वाण.jpg|इवलेसे|सुगड आणि वाणाचे साहित्य]]मकरसंक्रांत हा [[भारत|भारतातील]] [[पौष]] महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित [[सण]] आहे. दक्षिणी भारतात हा सण [[पोंगल]] या नावाने ओळखला जातो. |
||
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. |
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली |
||
मकरसंक्रांतीच्या दिवशी [[सूर्य]] [[धनु रास|धनू]] राशीतून [[मकर रास|मकर]] राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसंबॆपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. |
|||
''उत्तरायण''' शब्द, दोन [[संस्कृत]] शब्द ''उत्तर'' (उत्तर दिशा) व ''अयन'' (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा [[संधी]] आहे. |
''उत्तरायण''' शब्द, दोन [[संस्कृत]] शब्द ''उत्तर'' (उत्तर दिशा) व ''अयन'' (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा [[संधी]] आहे. |
||
==मकरसंक्रांतीच्या |
==मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा== |
||
इसवी सन १६०० : ९ जानेवारी |
इसवी सन १६०० : ९ जानेवारी |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
इसवी सन १८५० : १२ जानेवारी. |
इसवी सन १८५० : १२ जानेवारी. |
||
सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :- |
|||
१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९. |
|||
१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००. |
|||
१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे. |
|||
२१:३६, २९ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो.
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसंबॆपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
उत्तरायण' शब्द, दोन संस्कृत शब्द उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा संधी आहे.
मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा
इसवी सन १६०० : ९ जानेवारी
इसवी सन १७०० : १० जानेवारी
इसवी सन १८०० : ११ जानेवारी
इसवी सन १८५० : १२ जानेवारी.
सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-
१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.
१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.
१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.
भोगी
संंक्रांंतीचा आदला दिवस भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगभाज्या, फळभाज्या यांंची तीळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे महत्व विशेष आहे.थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.
महाराष्ट्रातील संक्रांत
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. खरचं! "तिळ गुळ घ्या गोड बोला" या शब्दात केवळ अर्थ भरला आहे.
आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
पंढरपूरमधील संक्रांत
या दिवशी भोगी करणे, वाण- वसा, वोवसायला जाणे या सारख्या रिती, परंंपरा आजही जोपासल्या जातात. महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये महिला वाण-वसा देतात. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा सकाळ पासून महिला भाविकांची एकच गर्दी दिसून येते. रुक्मिणी माता मंंदिरात महिला एकमेकीना वाण - वसा मोठ्या श्रद्धेने देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
तीळवण व बोरन्हाण
नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे.तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते.हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.
लहान बालकांंनाही संंक्रांंती निमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे, हलव्याचे दागिने घालणे अशी पद्धती दिसून येते.चुरमुरे,बोरे,हरभरे,ऊसाचे तुकडे,हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर घातले जाते.अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्कीटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रण मध्ये लहान मुलांचे आवडते चोकोलेटस घालतात. याला बोरन्हाण असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
प्रादेशिक विविधता
संक्रात समग्र दक्षिण पूर्व आशिया मध्ये थोडया स्थानिक बदलासह साजरी करतात.
- उतर भारतात,
- हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
- पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
- पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटी साठी छोटी मुले घरोघरी जावून गाणी म्हणतात व शोकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात.शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात.हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवस असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा केले जाते.[१]
- पूर्व भारतात,
- बिहार - संक्रान्ति
- आसाम - भोगाली बिहु, (Bhogali Bihu)
- पश्चिम बंगाल - मकर संक्रान्ति
- ओडिशा - मकर संक्रान्ति
- पश्चिम भारतात,
- गुजरातमध्ये या दिवशी धान्य,तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.
- दक्षिण भारतात,
- कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
- तमिळनाडू - पोंगल, (Pongal)
- दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात.सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात.मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
- शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
- भारताचे अन्य भागात मकर संक्रान्ति
- नेपाळमध्ये,
- थारू (Tharu) लोक - माघी
- अन्य भागातमाघ संक्रान्ति (Maghe Sankranti) के माघ सक्राति (Maghe Sakrati)
- थायलंड - सोंग्क्रान (สงกรานต์ Songkran)
- लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
- म्यानमार - थिंगयान (Thingyan)
यात्रा
मकरसंक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा. हा दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नासिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याखेरीज कोलकाता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.
या दिवशी केरळमधील शबरीमाला डोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते.
गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.
पुराणातील उत्तरायण
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यांनी या दिवशी उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केला.. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.
बाह्य दुवे
- http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-articles/aali-makar-sankranti/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - मकर संक्रान्ति का? इंग्रजीत
- मकर संक्रान्ति व हिंदू समाज इंग्रजीत
- जगातील वेगवेगळ्या भागातील मकरसंक्रांतीच्या तारखा
- गुजरातमधील संक्रातीची चित्रे
- http://www.marathigreetings.net/sankrant-marathi-greeting-cards/. Missing or empty
|title=
(सहाय्य)[मृत दुवा]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.
- ^ Shakti Gupta, Festivals, fairs and fasts in India