बाजरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाजरी
Grain millet, early grain fill, Tifton, 7-3-02.jpg
शास्त्रीय वर्गीकरण
जीव: P. glaucum
शास्त्रीय नाव
Pennisetum glaucum
(लिनेयस.)रॉबर्ट ब्राउन
बाजरीची कणसे(नजिकचे दृश्य)

बाजरी(शास्त्रीय नाव:Pennisetum glaucum) हे एक प्रकारचे धान्य आहे. बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी (वार्षिक सरासरी पर्जन्यमान < २०० मिमी.) लागते. बाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिका येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरुन पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते. बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याने भारतात बाजरीचा उपयोग खाद्यासाठी - प्रामुख्याने भाकरी बनवण्यासाठी - मोठ्या प्रमाणावर केला जातो.

पिकावरील रोग[संपादन]

या पिकावर कवकजन्य असलेल्या अरगट या रोगाचा प्रादुर्भाव होतो.[१]

संदर्भ[संपादन]