मूग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मूग

हे एक द्विदल कडधान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोक आवडीने खातात. भारत, चीन, थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, बांगलादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन भारतीय पद्धतीमध्ये मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मूग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते. हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात.

इतिहास[संपादन]

मुगाचा उगम भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.स. पूर्व १५ व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. चरक या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात.

आहारशास्त्रदृष्ट्या महत्त्व[संपादन]

मोड आलेले मुगाचे कडधान्य

मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क जीवनसत्त्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसपोटॅशियम असे घटक असतात. इंडोनेशियात मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारतात मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.मोड आलेल्या मुगाची उसळ जेवणात केली जाते.

चित्रदालन[संपादन]

[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-10-15. 2018-04-23 रोजी पाहिले.