Jump to content

"वसंतराव देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ४६: ओळ ४६:
डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात अनेक संस्था निघाल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या :
डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात अनेक संस्था निघाल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या :


* डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन , चिंचवड (पुणे)
* डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन , चिंचवड (पुणे) (अध्यक्ष डॉ. रवींद्र घांगुर्डे) : ही संस्था इ.स. १९८९ सालापासून, दरवर्षी मेच्या पहिल्या आठवड्यात संगीत महोत्सव साजरा करते. या संस्थेने आजवर अनेक गुणी कलाकारांना संधी दिली व त्यांना घडविले.


==पुरस्कार==
==पुरस्कार==


* वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन(चिंचवड) ही संस्था दरवर्षी तरुण उभरत्या गायकांना वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार देते.
* वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन(चिंचवड) ही संस्था दरवर्षी तरुण उभरत्या गायकांना वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार देते. मे २०१३ मध्ये झालेल्या २५व्या वर्षीच्या महोत्सवात नाट्यसंगीतासाठी लीलाधर चक्रदेव याला, आणि शास्त्रीय संगीतासाठी आर्या आंबेकर हिला ’डॉ. वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार’ देण्यात आले. २५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०२:०४, ८ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

वसंतराव देशपांडे

वसंतराव देशपांडे
आयुष्य
जन्म मे २, इ.स. १९२०
जन्म स्थान मूर्तिजापूर, ब्रिटिश भारत
मृत्यू जुलै ३०, इ.स. १९८३
मृत्यू स्थान पुणे, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
वांशिकत्व मराठी, भारतीय
भाषा मराठी (मातृभाषा)
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्तानी संगीत,
मराठी नाट्यसंगीत
संगीत कारकीर्द
पेशा संगीत (गायन, वादन),
अभिनय (नाटके)

डॉ. वसंतराव देशपांडे (मे २, इ.स. १९२० ; मूर्तिजापूर, ब्रिटिश भारत - जुलै ३०, इ.स. १९८३ ; पुणे, महाराष्ट्र) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.

वसंतराव देशपांड्यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

संस्था

डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात अनेक संस्था निघाल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या :

  • डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन , चिंचवड (पुणे) (अध्यक्ष डॉ. रवींद्र घांगुर्डे) : ही संस्था इ.स. १९८९ सालापासून, दरवर्षी मेच्या पहिल्या आठवड्यात संगीत महोत्सव साजरा करते. या संस्थेने आजवर अनेक गुणी कलाकारांना संधी दिली व त्यांना घडविले.

पुरस्कार

  • वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन(चिंचवड) ही संस्था दरवर्षी तरुण उभरत्या गायकांना वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार देते. मे २०१३ मध्ये झालेल्या २५व्या वर्षीच्या महोत्सवात नाट्यसंगीतासाठी लीलाधर चक्रदेव याला, आणि शास्त्रीय संगीतासाठी आर्या आंबेकर हिला ’डॉ. वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार’ देण्यात आले. २५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

बाह्य दुवे

  • http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Vasantrao%20Deshpande.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  • http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Vasantrao%20Deshpande.htm. Missing or empty |title= (सहाय्य)