Jump to content

चिकारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिकारा हे एक तंतुवाद्य होते. ते दिसायला सारंगीसारखेच होते, मात्र तिच्याहून ते लहान असायचे. यामध्ये एका चर्मवेष्टित पेटीला एक पोकळ व लांब लाकडी ठोकळा जोडतात. त्यावर तातीच्या तीन तारा व धातूच्या पाच तारा बसवतात. तातीच्या तारा षड्ज, मध्यम व पंचम या स्वरांत व धातूच्या तारा षड्ज, ऋषभ, पंचम, धैवतनिषाद या स्वरांत लावतात. गजाच्या सहाय्याने हे वाद्य वाजविले जायचे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=O5DvP4hoPcOkxcwP/mOXqs1BZZwvXxak6RQftbi5SgfxYevj3TJwwg== [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती