झेंगट (वाद्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झेंगट हे एक घनवाद्य आहे. हे बहुधा कांशाचे असते. याचा आकार थाळीसारखा वाटोळा असून त्याच्या एका कडेला एक छिद्र असते. त्या छिद्रातून एक दोरी ओवून त्या दोरीला बांबूचा एक पातळ तुकडा किंवा पोकळ तुकडा बांधलेला असतो. त्याला नरुआ असे नाव असून, त्याच्या साहाय्याने हे झेंगट वाजवितात. झेंगटाचा उपयोग मंदिरात आरतीच्या प्रसंगी केला जायचा.