खंजिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खंजिरी

खंजिरी हे एक चर्मवाद्य आहे. तुकडोजी महाराज हे वाद्य त्यांच्या भजनांत वाजवीत असत.
गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते. लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठरावीक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात. या चकत्या एकमेकांवर आपटून नाद निर्माण होतो. खंजिरी एका हातात धरून दुसऱ्या हाताने आघात करून वाजवली जाते. लोकसंगीतात खंजिरीचा नियमित वापर होतो.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.