राग जोगकंस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग जोगकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जोगकंस हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक राग असून आसावरी थाटात ह्याची मांडणी केलेली आहे. 'गुणिदास' उर्फ जगन्नाथबुवा पुरोहित ह्या रागाचे जनक म्हणून ओळखले जातात. राग जोग आणि 'कौंस' अंगाच्या स्वरावलींचा मिलाफ म्हणून हा राग प्रचलित आहे.

जगन्नाथबुवांचा मानस मालकंसावर आधारित राग रचण्याचा होता. मात्र ह्या रागात शुद्ध निषादाला वरचढ ठरवून मालकंसातला कोमल निषाद आटोपता ठेवला. म्हणूनच चंद्रकौंसाशी ह्या रागाचं साधर्म्य जाणवतं.