क्लॅरिनेट
क्लॅरिनेट हे फुंकून वाजवण्याच्या प्रकारातले वाद्य आहे. इ.स. १६९० मध्ये जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात पहिले क्लॅरिनेट तयार केले गेले होते. हे वाद्य देनर या संगीतकाराने तयार केले. क्लॅरिनेट हे नाव क्लॅरिनेटो या मूळ इटालियन शब्दावरून आले आहे.
पाश्चात्त्य वाद्यवृंदातील चार सुषिर वाद्यांपैकी हे एक आहे. बासरी, ओबो व बसून ही इतर तीन वाद्ये होत. क्लॅरिनेटचे बेस, अॅल्टो इ. अनेक प्रकार असतात. हे प्रकार त्यातून निघणाऱ्या स्वरांच्या पल्ल्यांवर आधिरत असतात. सर्वसाधारणतः दंडगोलाच्या आकाराच्या नळीच्या तोंडाशी एकेरी जिव्हाळी लावलेल्या या वाद्याचे नियंत्रण ओठांनी करता येते.
मोझार्टने मानहाइम वाद्यवृंदातील वादकांकडून हे वाद्य ऐकल्यावर त्याने कॉंचेर्टो व क्विंटेट पद्धतीच्या रचना या वाद्यासाठी लिहिल्या. यानंतर ॲंड्रु लॉइड वेबरने आपल्या कॉंचेर्टस्टुकमध्ये याचा वापर केला. जर्मन संगीतज्ञ वॅगनर याने आपल्या संगीतिकांसाठी क्लॅरिनेटचा उपयोग केला.
वाद्याचे स्वरूप[संपादन]
आधुनिक संगीतातील स्थान[संपादन]
अभिजात संगीतातील स्थान[संपादन]
नावाजलेले क्लॅरिनेट वादक[संपादन]
बेनी गुडमन, रेजिनाल्ड केल, जॅक ब्रायमर, जेरवास द पेये हे काही आधुनिक क्लॅरिनेट वादक आहेत.
अधिक वाचन[संपादन]
हे सुद्धा पहा[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |