तुतारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुतारी फुंकणारा तुतारीवाला (मुंबई, इ.स. २००६)

तुतारी (स्त्रीलिंगी नाम; अनेकवचन: तुताऱ्या) हे भारतीय उपखंडात, विशेषकरून महाराष्ट्रात, प्रचलित असणारे एक सुषिर (म्हणजे तोंडाने फुंकून वाजवण्याचे) वाद्य आहे. ही आकडेबाज वळणाची, म्हणजे साधारणतः इंग्रजी 'सी' आकाराची असते व तिचा आकार वाजविणाऱ्याच्या तोंडाकडे निमुळता होत आलेला असतो. सर्वसाधारणपणे, हे पितळेचे बनविलेले असते. मात्र सध्या अन्य धातू व मिश्रधातूंमध्येही तुताऱ्या बनवल्या जातात.

पूर्वी लढाईस तोंड फुटणे किंवा राजाचे आगमन होणे, इत्यादी प्रसंगी तुतारी फुंकली जात असे. वर्तमान काळात लग्नप्रसंगात किंवा सभासमारंभांच्या उद्घाटनप्रसंगी हिचा वापर होताना आढळतो.

चित्रदालन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.