Jump to content

जोड राग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपल्या हिंदुस्थानी राग संगीतात अनेक राग असे आहेत की जे अन्य दोन रागांचे मिश्रण करून तयार झाले आहेत/बनवले गेले आहेत. अश्या रागांना 'जोड राग' असे संबोधले जाते. जोड रागात, जे दोन राग अंतर्भूत असतात त्या दोन रागांचे बेमालूम मिश्रण केलेले असते व ते श्रवणास आनंददायी असते. एखादा कलाकार जेव्हा जोड रागाचा विस्तार करतो तेव्हा तो श्रोत्यांना सातत्याने दोन्ही रागांचे रंग आलटून पालटून दाखवत असतो. जोड राग उतम प्रकारे मांडणे, गाणे हे एक अवघड तसेच आव्हानात्मक काम असते.

जोड रागांची बसंतबहार, भैरवबहार, बसंतीकेदार, जोगकंस, ललितागौरी, राग अडाणाबहार, भैरवभटियार, नटभैरव अशी अनेक उदाहरणे देता येतील.