भांगसर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भांगसर म्हणजेच थाळा. हे वाद्य नाशिक जिल्ह्यातील कोकणा (कोकणा समाज/कोकणा जमात) आणि वारली समाजातील पुरुष वाजवितात. गावदेवीच्या पूजेसाठी तसेच मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना हे वाद्य वाजविले जाते. सरपट नावाच्या झाडाच्या काठीच्या टोकाला एक खास प्रकारचे कोथीचे (?) मेण लावून ही काठी पितळी थाळीच्या पृष्ठभागावर चिकटवतात. उभ्या काठीवर हाताने विशिष्ट प्रकारे घर्षण करून थाळीवर कंपने निर्माण करत त्याच्या लयींवर आदिवासी गाणे म्हणतात. याच तालावर ते कथाही सांगतात.[१]

  1. ^ http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=yllaoRTSqvO1nCYYIFvMYbYkhCnMTWVcSx4gX03APVdVcmhDH7y4cw== ची कॅश आहे. 22 Oct 2009 01:07:02 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.