मंजिरी केळकर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मंजिरी केळकर | |
---|---|
आयुष्य | |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
वडील | आनंद असनारे |
जोडीदार | अभिजित केळकर |
अपत्ये | मानसी केळकर |
संगीत साधना | |
गुरू | पं.चिंतुबुवा म्हैसकर पं. मधूसूदन कानेटकर विदुषी किशोरी आमोणकर |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत |
घराणे | जयपूर घराणे |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गौरव | |
पुरस्कार | बिस्मिल्ला खान पुरस्कार |
मंजिरी केळकर (जन्मदिनांक २५ सप्टेंबर १९७१- हयात) ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका आहेत. त्या जयपूरच्या अत्रौली घराण्याच्या संगीतशैलीत गातात.
पूर्वायुष्य
[संपादन]वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांचे वडील प्रा. आनंद असनारे हे उत्कृष्ट तबलावादक होते. लहानपणापासूनच मंजिरी वडिलांना रियाज करताना पाहत आल्या. शाळेत गायन आणि कथक या दोहोंचीही आवड होती. पण त्यांचा कल गायनाकडे जास्त असल्याचे लक्षात आल्यावर गाण्याकडेच अधिक लक्ष देण्यात आले. मंजिरी मूळच्या सांगलीच्या आहेत. सांगलीच्या पं. म्हैसकर यांच्याकडे त्यांनी सुरुवातीला शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. मंजिरी यांना त्यांनी रागांचे सादरीकरण काय असते हे शिकवले. त्यानंतर म्हणजे १९८८नंतर मंजिरी यांनी पं. मधूसूदन कानेटकर यांचे शिष्यत्व पत्करले. गानसरस्वती किशोरी आमोणकर व विदुषी पद्मा तळवलकर याही त्यांना गुरू म्हणून लाभल्या आहेत.
सांगीतिक कारकीर्द
[संपादन]सवाई गंधर्व संगीत महोत्सव, मेघमल्हार महोत्सव, जयपूर महोत्सव, पंडित पलुस्कर महोत्सव, तानसेन महोत्सव अशा नामवंत महोत्सवांमध्ये त्यांनी गायन सादर केले आहे. जयपूर घराण्याच्या शैलीबरोबरच विविध संगीत संस्कार त्यांच्यावर घडले. त्याचे गायकीवर पडणारे प्रतिबिंब मंजिरी केळकरांना वेगळेपण मिळवून देते, असे समजले जाते.
पुरस्कार आणि शिष्यवृत्ती
[संपादन]- दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा २००६चा पहिला 'उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार'
- केंद सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयामार्फत १९९१ ते ९३ या कालावधीत शिष्यवृत्ती
- एनसीपीएची केसरबाई केरकर शिष्यवृत्ती
- मुंबईच्या पु.ल. देशपांडे अकादमीतर्फे १९९४ साली 'यंग परफॉर्मिंग आर्टिस्ट' पुरस्कार
- पहिला गानसरस्वती किशोरी आमोणकर पुरस्कार (२०१८)