वसंतराव राजूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वसंतराव राजूरकर
आयुष्य
जन्म २४ एप्रिल.१९३२
जन्म स्थान ग्वाल्हेर (भारत)
मृत्यू १२ फेब्रुवारी, २०१६
मृत्यू स्थान हैदराबाद
मृत्यूचे कारण दीर्घ आजार व वृद्धापकाळ
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव ग्वाल्हेर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
जोडीदार मालिनी राजूरकर (पत्‍नी)
अपत्ये दोन कन्या
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

वसंतराव राजूरकर (जन्म : ग्वाल्हेर, २४ एप्रिल, इ.स. १९३२ - हैदराबाद, १२ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे एक ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. गायिका मालिनी राजूरकर या त्यांच्या पत्‍नी. त्यांना दोन कन्या आहेत.

वसंतरावांनी गायन शाळेत संगीत विशारद केले. पुढे त्यांचे काका (गायक गोविंदराव राजूरकर) प्राचार्य असलेल्या अजमेरच्या संगीत महाविद्यालयात वसंतरावांनी पुढचे शिक्षण घेतले. पं. राजाभैय्या पूंछवाले यांच्या घरी दर गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये वसंतराव तंबोऱ्याची साथ करताकरता गाऊ लागले.

पुढे हैदराबाद येथील म्युझिक कंपनीमध्ये नोकरी स्वीकारून वसंतराव १९५४ मध्ये तेथेच स्थायिक झाले. अजमेर येथे काकांकडे गेल्यानंतर त्यांची शिष्या मालिनी वैद्य यांच्याशी वसंतरावांचा परिचय झाला आणि पुढे हे दोघेही विवाहबद्ध झाले.

वसंतराव राजूरकरांचे शिष्य[संपादन]

धृपद, ख्याल, टप्पा, बंदिशची ठुमरी, ठायीची ठुमरी, तराणा, त्रिवट, चतरंग, रासख्याल, उपख्याल, अष्टपदी वगैरे विविध संगीत प्रकारांवर प्रभुत्व असलेल्या वसंतराव राजूरकर यांनी अखेरपर्यंत विद्यादान केले. हैदराबादच्या संगीत महाविद्यालयात ते अध्यापक होते.

आराधना कऱ्हाड-शास्त्रीे, कल्पना झोकरकर, नितीन वेलणकर, प्रभा लिमये, मालिनी वैद्य राजूरकर, मुक्ता धर्म, वगैरे त्यांचे शिष्य होत.